नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, कुºहेगाव, जानोरी आदी भागातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ मुदतीपूर्व घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी केले आहे.पंतप्रधान पीक विमा योजना हंगामी पिकांशी निगडीत आहे. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकºयांना पंतप्रधान पीक विमा हे एक पीक संरक्षणासाठी योग्य माध्यम आहे. विमा हप्ता भरतेवेळी शेतकºयांनी आधारकार्ड लिंक्ड बँक पासबुक, सातबारा उतारा, पीक पेरणी दाखला सोबत आणावा. नैसर्गिक कारणांमुळे पीकांची हानी झाल्यास या विमा योजनेतून हानी भरून काढता येणश्र आहे.मागील वर्षी तालुक्यातील ३८५२ शेतकºयांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. या तुलनेत यावर्षी कृषी विभागाने केलेल्या प्रचार व प्रसिद्धीमुळे शेतकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा आकडा दुप्पट होऊन आत्तापर्यंत ६००२ शेतकºयांनी पीक विमा अर्ज भरले असल्याचे तवर यांनी सांगितले.विम्याचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील शेतकºयांनी शुक्रवार दि. ३१ जुलैपर्यंत पीक विमा प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक कृषी मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.पिके विमा हप्ता. (प्रति हेक्टरी)भात - ९०० रु .सोयाबीन - ९०० रू.भुईमूग - ७०० रू.उडीद - ४०० रू.मूंग - ४०० रू.मका - ६०० रू.यावर्षी जुलैचा शेवटचा आठवडा देखील संपत आला असून आजपर्यंत पावसाने दढी मारल्यामुळे कदाचित पुढील आठवड्यापासून पावसाला सुरूवात होईल, यामुळे तालुक्यातील शेतकºयांनी येत्या दोन तीन दिवसात कागदपत्रांची पुर्तता करु न पिक विमा काढावा जेणेकरून झालेल्या नुकसानीचा लाभ मिळेल.- पांडूरंग वारु ंगसे, माजी उपसभापती, इगतपुरी पंचायत समिती. (फोटो २९ पिक विमा)
यावर्षी पिक विम्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 15:37 IST
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, गोंदे दुमाला, कुºहेगाव, जानोरी आदी भागातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ मुदतीपूर्व घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तवर यांनी केले आहे.
यावर्षी पिक विम्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद
ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यात : कृषीविभागाच्या प्रचारामुळे ६००२ अर्ज दाखल