नुकसानभरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:54 PM2020-02-13T22:54:35+5:302020-02-14T00:45:44+5:30

आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत न मिळाल्याने हतबल झालेल्या धनेर, ता. नांदगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.

Farmers' request for compensation | नुकसानभरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन

शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शासनाला निवेदन देताना धनेर येथील मच्छिंद्र वाघ, पोपट पवार, साईनाथ चव्हाण आदी शेतकरी़

Next

मनमाड : आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमध्ये झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई अद्यापपर्यंत न मिळाल्याने हतबल झालेल्या धनेर, ता. नांदगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये धनेर येथे चिंच नदीला आलेल्या पुरामध्ये नदीकाठच्या शेतकºयांची जमीन वाहून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही शेतकºयांच्या शेतात उभे असलेले कांद्याचे पीक वाहून गेले. या झालेल्या नुकसानीचे तालुका कृषी कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले होते. अनेक महिन्यांचा कालावधी उलटूनही या शेतकºयांना अद्यापपर्यंत नुकसानभरपाई मिळालेली नाही. तरी याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करून शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर मच्छिंद्र वाघ, भारती पवार, पोपट पवार, साईनाथ चव्हाण, केवळ बच्छाव, छगन गोराडे, वाल्मीक गोराडे, दौलत वाघ आदी शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Farmers' request for compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.