शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मका खरेदी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 15:58 IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांकडील उर्वरित मका राज्यशासन खरेदी करणार असल्याची घोषणा अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केलीे आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी राज्य सरकारने अचानक मका खरेदी बंद केल्याने नाशिक जिल्ह्यातील सुमारे दिड हजार शेतक-यांकडे असलेला ५०हजार क्विंटल मका पडून होता.या पार्श्वभुमीवर आमदार जयंत जाधव यांनी ...

ठळक मुद्देगिरीष बापट : विधीमंडळात प्रश्न उपस्थितसुमारे दिड हजार शेतक-यांकडे असलेला ५०हजार क्विंटल मका पडून

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांकडील उर्वरित मका राज्यशासन खरेदी करणार असल्याची घोषणा अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केलीे आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी राज्य सरकारने अचानक मका खरेदी बंद केल्याने नाशिक जिल्ह्यातील सुमारे दिड हजार शेतक-यांकडे असलेला ५०हजार क्विंटल मका पडून होता.या पार्श्वभुमीवर आमदार जयंत जाधव यांनी विधीमंडळ अधिवेशनात नियम ९३ अन्वये प्रश्न उपस्थित केला होता. आमदार जाधव म्हणाले, वर्षी जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने मक्याच्या उत्पादनात पाचपट वाढ झाली आहे. व्यापा-यांनी भाव पाडल्यामुळे राज्य सरकारने आधारभूत किंमतीत मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून त्यासाठी पणन महामंडळामार्फत खरेदी केंद्रे सुरु करण्यास अनुमती देणे तसेच मका उत्पादक शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती केली. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात ३४५८ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. शेतक-यांची वाढती मागणी पाहून पणन महामंडळाने जिल्ह्यात दहा ठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरु करण्याची कार्यवाही केली. मात्र गोदामांच्या उपलब्धतेमुळे काही ठिकाणी खरेदी केंद्रे सुरु होण्यास उशीर झाला. याच दरम्यान गेल्या वर्षी आधारभूत किंमतीत खरेदी केलेल्या मका रेशनमधून शिधापत्रिका धारकांना वाटप करण्याच्या सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्यामुळे गोदामांचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. नाशिक जिल्ह्यातील दिड हजार शेतक-यांकडे अंदाजे ५० हजारांहून अधिक क्विंटल मका पडून असतांना त्यांची खरेदी सुरु असतांना गेल्या आठवड्यात राज्य सरकारने मका खरेदी केंद्रांवरील बिलाची आॅनलाईन यंत्रणाच बंद करून टाकली. परिणामी मका खरेदी केला तरी शेतक-यांना पैसे अदा करण्यासाठी नोंदणी केली जाणारी बेवसाईटच बंद झाली.या प्रस्तावरील उत्तरात अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे की, हंगाम २०१७-१८ मध्ये केंद्र शासनाच्या एकरूप विनिदेर्शानुसार दि.४ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार खरेदी सुरु करण्यात आली होती. सदर शासन निर्णयामध्ये खरेदीची मुदत दि.१ नोव्हेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ अशी नमूद करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही पूर्व सूचना न देता खरेदी बंद केलीली नाही. भरडधान्य खरेदीचा कालावधी दोन महिन्यांहून अधिक असू नये असे केंद्र शासनाने निर्देश असल्याने दोन महिन्यांची मयार्दा घालणे राज्य शासनास भाग पडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आॅनलाईन खरेदी करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना असल्याने खरेदी प्रक्रिया आॅनलाईन राबविणे राज्यास अनिवार्य होते. त्यानुसार दि.३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन नोंदणी झालेल्या शेतक-यांचा मका खरेदी करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात दोन्ही अभिकर्ता संस्थांच्या १० खरेदी केंद्रावरून ३५६५ शेतक-यांची आॅनलाईन नोंदणी झाली असून २१४३ शेतक-यांचा ९९९८६.५४ क्विंटल मका खरेदी केला आहे. नाशिक जिल्ह्यातील आॅनलाईन लॉट एन्ट्री केलेल्या सर्व शेतक-यांच्या खात्यावर रक्कमा जमा करण्यात आल्या आहेत. तथापि तांत्रिक त्रुटीमुळे प्रदान बाकी असल्याने शेतक-यांना त्रुटी दूर करून रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.केंद्र शासनाने राज्यास केवळ १,१८,७९० क्विंटल मका खरेदीची परवानगी दिली होती. तथापि राज्यातील विक्रमी मका उत्पादन व लोकप्रतिनिधीच्या मागणीचा विचार करून सदर मयार्दा ५ लाख क्विंटल इतकी वाढवून घेण्यात आली आहे. आता सदर मयार्दा संपल्याने अधिकची खरेदी करता येणे शासनास शक्य होत नाही. तथापि पुनश्च मका खरेदीच्या मायार्वाढीबाबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे विनंती करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांकडील उर्वरित मका खरेदी केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नाशिक जिल्यातील मका उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक