शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी किसान सभेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:29 IST

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

नाशिक : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.  दुपारी बारा वाजता गोल्फ क्लब मैदानावरून आमदार जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. जुना त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, शालिमार चौक मार्गे शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चा अडविण्यात येऊन तेथून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. किसान सभेचा मोर्चा असल्याने त्याचा धसका पोलीस व जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे गोल्फ क्लब मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जागोजागी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.या मोर्चात किसन गुजर, सावळीराम पवार, सुनील मालुसरे, इंद्रजित गावित, मोहन जाधव, रमेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्यायंदा पाऊस कमी झाल्याने संपूर्ण जिल्ह्णात दुष्काळ जाहीर करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे. पश्चिम नदी जोड प्रकल्प रद्द करून नार-पार, दमण गंगेचे पाणी अडविण्यात यावे. तसेच वनहक्क कायद्यान्वये फेटाळलेले सर्व दावे मान्य करण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, दुष्काळग्रस्त भागातील शेतकºयांचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, जुने रेशन कार्ड बदलून द्यावे, जिल्ह्णातील उपवन संरक्षक शिवबाला व श्रीमती बिवला यांची तत्काळ बदली करा आदी मागण्या करण्यात आल्या.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय