शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड महावितरण कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 22:30 IST

मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील महावितरणने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २०) संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.

ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित : पूर्वसूचना दिली जात नसल्याची तक्रार

मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील महावितरणने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २०) संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.सध्या येवला तालुक्यातील मुखेड परिसरात कांद्याची लागवड सुरू असताना महावितरण कोणतीही पूर्वसूचना न देता वीज तोडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, जे शेतकरी बिल भरण्यास तयार आहेत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नका, अशी विनंती करूनही अधिकाऱ्यांनी ७० टक्के वसुली झाल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत करण्यास नकार दिल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले.यावेळी मुखेड महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमोल राजोळे यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, सध्याच्या परिस्थितीत मुखेड येथील ४ आणि दत्तवाडी येथील २ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला होता. मात्र शेतकऱ्यांच्या विनंतीवरून हा खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करणार आहे. थकीत बिल बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी वीज बिल सवलत योजनेत सहभागी होऊन थकीत असलेल्या रकमेत ६६ टक्के सवलत मिळणार आहे. याप्रसंगी शिवसेनेचे नेते छगन आहेर, पवन आहेर, सुरेश वाघ, विठ्ठल कांगणे, विनायक आहेर, प्रल्हाद कदम, अशोक शेळके, ज्ञानेश्वर शिवपुरे, भास्कर आहेर, सुनील आहेर, किशोर आहेर आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :yevla-acयेवलाelectricityवीज