शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
3
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
4
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
5
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
6
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
7
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
8
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
10
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
11
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
12
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
14
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
15
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
16
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
17
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
18
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
19
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
20
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लॉकडाऊन पावला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 18:05 IST

सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत लॉकडाऊन पाळावा लागत असल्याने निफाड सारख्या सधन तालुक्यातील शेतीची कामे करणारे मजूर गावी गेले होते, तसेच शहरातील अनेक उद्योग व्यवसायावर अवकळा प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देपेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मजूर परतले शेती मशागतीला

सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत लॉकडाऊन पाळावा लागत असल्याने निफाड सारख्या सधन तालुक्यातील शेतीची कामे करणारे मजूर गावी गेले होते, तसेच शहरातील अनेक उद्योग व्यवसायावर अवकळा प्राप्त झाली आहे. त्यामुळे खेडेगावातून शहराकडे कामानिमित्त स्थलांत केलेल्यांची घरवापसी झाल्याने कधी नव्हे असा मजुरवर्ग गावागावात सद्या उपलब्ध झाला आहे. असे असतांनाही मजुरीचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने तोट्याच्या शेतीला कोरोनाच्या संक्र मणाने शेवटी बळीराजालाही जास्त मजुरी देण्याच्या प्रकारामुळे तोंडघसी पाडले आहे.गेल्या चार महिन्यापासून जवळपास महाराष्ट्रातील अनेक महानगरात कोरोना संक्र मणाची साखळी घट्ट होत असल्याने ते रोखण्यासाठी प्रशासनाला कडक लॉगडाऊनची अंमलबजावणी करावीच लागत आहे. या लॉग डाऊनमुळे छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय अडचणीत सापडले असून कंपन्यात व इतर सर्व क्षेत्रात कमी उपस्थिती गरजेचे असल्याने कंपन्यांनी यातून काढता पाय घेत नोकरवर्ग व मजुरांची कपात केली आहे. हे नोकर व मजूरवर्ग परतीच्या मार्गाने घरी परतले असून शेतीमध्ये राबत आपला चरितार्थ सद्या चालवीत आहेत.चार महिन्याच्या प्रतिक्षेनंतरही कोरोना बाधितांचा हा आकडा वाढतच असल्याने शहराकडे जाण्याचा इरादा अनेकांनी सद्या तरी सोडून दिला असुन शेतकऱ्यांच्या साथीला हातभार लावताना त्यांना शहरातील अधिक मजुरीची सवय असल्याने शेतीत पण चांगली रोजदारी मिळावी यासाठी अंगावर (उधडे) काम घेऊन जास्त मजुरी घेण्यावर भर असल्याने मजुरीचे दर वाढविले जात आहेत. परिणामी संकटात सापडलेल्या शेतकºयाला वाढलेले मजुरीचे दर चिंतेत भर पाडत आहे.मजुरीचे दर व खताची कमतरता सतावतेय...!सद्या खरीप हंगामासाठी मजुरांची मुबलकता असतांना मजुरीचे दर मात्र अजूनही चढेच आहे. पाऊस टप्प्याटप्प्याने पडत असल्याने आंतरमशागतीला भरपूर वेळ मिळत गेला तरी मजुरीचे दर मात्र कमी होण्याची नाव घेत नसून एका दिवसाला पारगी दुपारपर्यंत निंदणीचे २०० ते २५० रु पये तर फवारणी व कोळपणीसाठी ३०० ते ३५० रु पये शेतकºयांना मजुरी द्यावी लागत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी