शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी-मजुरांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:37 IST

शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतमजुरांची मजुरी कमी करण्याचा निर्णय गिरणारे परिसरातील शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर वाद निर्माण झाला असून, मजुरांनी थेट कामावर बहिष्काराचे अस्त्र उपसल्यामुळे होत असलेल्या शेतमालाच्या नुकसानीमुळे मजूर व शेतकरी यांच्यातील वादात अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे.

ठळक मुद्देपोलिसांची मध्यस्थी : सामोपचाराने काम करण्याचा निर्णय

समसाद पठाण । गंगापूर : शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतमजुरांची मजुरी कमी करण्याचा निर्णय गिरणारे परिसरातील शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर वाद निर्माण झाला असून, मजुरांनी थेट कामावर बहिष्काराचे अस्त्र उपसल्यामुळे होत असलेल्या शेतमालाच्या नुकसानीमुळे मजूर व शेतकरी यांच्यातील वादात अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे. ज्या शेतकºयाला मजुरी परवडेल तो मजुरांना घेऊन जाईल, मात्र मजुरांची गाडी न अडविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.गुरुवारीच या संदर्भात गिरणारे येथे शेतकºयांची बैठक झाली होती व त्यात महिला मजुरांना दोनशे रुपये, तर पुरुष मजुराला अडीचशे रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते. हा निर्णय पंचक्रोशीतील शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात आला. शुक्रवारी त्याचे थेट परिणाम दिसेल. गिरणारे पाटी येथे मजूर नेहमीप्रमाणे जमा झाले असता शेतकºयांनी त्यांना अल्प मजुरीत नेण्याचा आग्रह धरल्यावर वाद निर्माण झाला. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेतली व शेतकरी, मजुरांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकºयांनी त्यांची व्यथा मांडली. भाव घसरले असून, टमाट्याला वीस ते चाळीस रुपये क्रेट भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत टमाटे काढण्यासाठी मजुरांना ४०० रुपये कसे द्यायचे, असा सवाल केला.मजुरांनीही वाढत्या महागाईचे कारण देत द्राक्षबागेच्या कामासाठी जादा पैसे मिळत असून, जेथे जादा मजुरी मिळेल तेथे काम करण्याची तयारी असल्याचे सांगितले. अखेर या दोघांमध्ये समेट घडवून ज्या शेतकºयाला मजुरी परवडेल तो मजुरांना घेऊन जाईल ज्यांना परवडत नाही, त्याने मजुरांना जबरदस्ती करू नये त्याचबरोबर मजुरांची गाडी कोणीही अडवणार नाही. तसे केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीagricultureशेती