शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी उन्हाळी कामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:46 IST

नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या उन्हाळी कामात व्यस्त आहे. ठिकठिकाणी उन्हाळ कांदा काढून चाळीत साठविणे, कोबी-फ्लॉवरची निंदणी व फवारणी, फुटवा बांधणी, भाजीपाल्याची काढणी आदी कामात येथील शेतकरी व्यस्त असल्याचे दिसत आहे.

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या उन्हाळी कामात व्यस्त आहे. ठिकठिकाणी उन्हाळ कांदा काढून चाळीत साठविणे, कोबी-फ्लॉवरची निंदणी व फवारणी, फुटवा बांधणी, भाजीपाल्याची काढणी आदी कामात येथील शेतकरी व्यस्त असल्याचे दिसत आहे.डिसेंबर ते जानेवारी दरम्यान लागवड केलेला कांदा एप्रिल-मे दरम्यान काढला जातो. एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव या परिसरातील काही शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा काढून झाला आहे, तर काही ठिकाणी अजूनही कांदा काढण्याचे काम सुरू आहे. ज्यांचा कांदा काढून झाला आहे त्यांनी ऊन, वारा व अवकाळी पावसापासून संंरक्षण करण्यासाठी कांद्यांच्या राशीवर पात पसरून त्यावर उसाचे पाचट व ताडपत्री टाकून झाकून ठेवले आहेत. काही ठिकाणी अजूनही उशिरा लावलेले कांदे मजुरांकडून भरून चाळीत नेऊन टाकले जातात. कांदे निवडून मजुरांकडून चाळीत साठवण्याची लगबग सुरू आहे. मजुरांची वानवा असल्याने ठेकेदारी पध्दतीने ही कामे केली जातात.सध्या उन्हामुळे दिवसभर उकाडा जाणवतो. त्यातच आभाळात काळ्या ढगांची गर्दी लक्षात घेता, अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वारा व गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर कांदा चाळीत साठवून ठेवण्याची लगबग सुरू आहे.- रुंजा पाटील-जगताप, शेतकरी, सामनगाव

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती