शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भावमंदीमुळे शेतकरी निराशेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:30 IST

पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सध्या चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समितीत विक्रीसाठी नेत असला तरी, कांद्यासह टमाटे व अन्य पिकांच्या भावातील मंदीमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपूर्व भागातील शेतकरी त्रस्तकांदा सडला, टमाटे फेकून द्यायची वेळ

शरदचंद्र खैरनार।लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे : पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सध्या चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समितीत विक्रीसाठी नेत असला तरी, कांद्यासह टमाटे व अन्य पिकांच्या भावातील मंदीमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यामुळे चाळीतच कांदा सडल्यामुळे साधारणत: ३० टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू लागला आहे.सध्या पोळ कांद्याचा (पावसाळी कांदा) हंगाम सुरू झाल्याने त्यालाही फारसा भाव नसल्याने ८०० ते ९०० रुपये क्विंटलने कांदा विकला जात आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळ कांद्याला शेतकºयांच्या अपेक्षेप्रमाणे भविष्यात जादा भाव मिळणार नाही, म्हणून शेतकरी आत्ताच पुरेसा पोळ कांदा मार्केटला येण्याच्या आत उन्हाळ कांदा नेण्याची लगबग करीत आहेत. उन्हाळ कांद्याला ३० टक्के घट असते; मात्र पोळकांद्याला घट नसते. तो ओला असल्याने वजनही चांगले भरते. त्यामुळे भाव आणखी खाली येण्याच्या आत उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटला येऊ लागला आहे.तालुक्यात काही ठिकाणी नुकतीच कोबी, फ्लॉवरची लागवड करण्यात आली आहे. भेंडीची लागवड होऊन सुमारे तीन आठवडे झाले आहेत. भेंडीला पिवळी फुले बहरू लागली आहेत. आणखी १५ ते २० दिवसांनी भेंडी बाजारात येईल. भेंडीतच आंतरपीक म्हणून शेपूची भाजी व कोथिंबिरीची लागवड करण्यावर शेतकºयांनी भर दिला असून, शेपूला भाजी बाजारात १० रुपये प्रती जुडीचा भाव आहे. मेथी व पालकाचीही पेरणी सुमारे महिनाभरापूर्वी केली आहे. रासायनिक खतांचा वापर शेतकरी करू लागल्याने महिनाभरातच या भाज्या बाजारात येऊ लागल्या आहेत.टमाटे उत्पादक नैराश्येतनाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, कळमकरवाडी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी, माडसांगवी या पंचक्रोशीतील शेतकºयांनी सध्या टमाटे खुडण्याची कामे सुरू केली आहेत; परंतु टमाट्याच्या गडगडलेल्या भावामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. सुमारे ७० दिवसांपूर्वी लागवड केलेले टमाट्याचे पीक जोमाने बहरले असून, सुरुवातीला साधारण ७० ते १०० रुपये एका क्रेटला भाव मिळाला; परंतु नंतर टमाट्याचे भाव गडगडल्याने काही शेतकºयांनी जनावरांना टमाटे खाऊ घालण्यास सुरुवात केली आहे.खराब कांदा हॉटेल व्यावसायिकांनाचांगला पोळ कांदा निवडीतून जो खराब कांदा शिल्लक राहतो तो १५० रुपये क्विंटलने किरकोळ व्यापारी खरेदी करतात व हाच कांदा शहरातील हॉटेलचालकांना त्यांंच्या मागणीनुसार पुरविला जातो. खराब कांदा हॉटेल व्यावसायिकांना पुरवणारी एक साखळी बाजार समितीत कार्यरत असून, त्यांना हॉटेलचालकांचे सहकार्य असल्याने हा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी