पिक विमा कंपनीच्या पावत्या पासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 03:46 PM2019-11-04T15:46:45+5:302019-11-04T15:48:14+5:30

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात अवकाळी पावसानंतर मका , सोयाबीन , रोपे ,कांदे , कपाशी , द्राक्षे आदि पिकांचे पंचनामे करण्यास सुरु वात झाली आहे. यात अनेक शेतकर्यांनी प्रधानमंत्री पिक योजनेचा अर्ज भरलेला असून प्रशासनाने दिलेल्या अदेशानंतर पिक विमा भरलेल्या शेतकर्यांचा आण िपिक विमा अर्ज न भरलेल्या शेतकर्यांचा दोन प्रकारे पंचनामा सुरु असून यात पिक विमा भरलेल्या अनेक शेतकर्यांकडून पिक विमा भरलेल्या पावत्या गहाळ झालेल्या आहे.

 Farmers deprived of their receipts due to the indirectness of the crop insurance company | पिक विमा कंपनीच्या पावत्या पासून शेतकरी वंचित

पिक विमा कंपनीच्या पावत्या पासून शेतकरी वंचित

Next
ठळक मुद्देशेतकरी सीएससी सेंटर वर पिक विमा भरलेल्या पावत्या घेण्यासाठी धाव घेत असून मागील दोन दिवसापासून संबधित पिक विमा कंपनीने पिक विमा भरलेल्या शेतकर्यांची संकलित केलेली माहिती चा तपशील गायब केल्याने पिक विम्याच्या निघत नसल्याने संबधित पिक कंपनीच्या आडमुठेपणा मुळ



मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात अवकाळी पावसानंतर मका , सोयाबीन , रोपे ,कांदे , कपाशी , द्राक्षे आदि पिकांचे पंचनामे करण्यास सुरु वात झाली आहे. यात अनेक शेतकर्यांनी प्रधानमंत्री पिक योजनेचा अर्ज भरलेला असून प्रशासनाने दिलेल्या अदेशानंतर पिक विमा भरलेल्या शेतकर्यांचा आण िपिक विमा अर्ज न भरलेल्या शेतकर्यांचा दोन प्रकारे पंचनामा सुरु असून यात पिक विमा भरलेल्या अनेक शेतकर्यांकडून पिक विमा भरलेल्या पावत्या गहाळ झालेल्या आहे. त्यामुळे पुन्हा पावती काढण्यासाठी शेतकरी सीएससी सेंटर वर पिक विमा भरलेल्या पावत्या घेण्यासाठी धाव घेत असून मागील दोन दिवसापासून संबधित पिक विमा कंपनीने पिक विमा भरलेल्या शेतकर्यांची संकलित केलेली माहिती चा तपशील गायब केल्याने पिक विम्याच्या निघत नसल्याने संबधित पिक कंपनीच्या आडमुठेपणा मुळे शेतकरी पिक विम्याच्या पावती पासून वंचित राहत आहे.तरी संबधित पिक विमा कंपनीने पिक विमा पावतीची माहिती आॅनलाईन प्रणालीवर उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहे. शासनाने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी मानोरी बुद्रुक , देशमाने , मुखेड , पिंपळगाव लेप , जऊळ्के आदि भागातील शेतकरी करत आहे. 04कॉर्प

Web Title:  Farmers deprived of their receipts due to the indirectness of the crop insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.