शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी फसवणूक रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 16:55 IST

दिंडोरी :द्राक्ष उत्पादक यांच्या फसवणुकीचे प्रकार वारंवार होत असून नुकतेच दिंडोरी निफाड चांदवड तालुक्यातील 50 हुन अधिक शेतकऱ्यांची एक निर्यातदार कंपनीने सुमारे 3 ते चार कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपन्नास शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस स्टेशनला अर्ज दिला

दिंडोरी :द्राक्ष उत्पादक यांच्या फसवणुकीचे प्रकार वारंवार होत असून नुकतेच दिंडोरी निफाड चांदवड तालुक्यातील 50 हुन अधिक शेतकऱ्यांची एक निर्यातदार कंपनीने सुमारे 3 ते चार कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आगाऊ धनादेश देत व्यापारी शेतमाल खरेदी करत फसवत असल्याचे प्रकार सातत्याने होत असल्याने व कायद्यात सदर फसवणुकीत कडक शिक्षा होत नसल्याने व्यापारी फसवणूक करत आहे तरी कोणताही धनादेश वेळेत वटला नाहीतर सदर गुन्हा अजामीनपात्र करत किमान पाच वर्षांची शिक्षा व दहा लाखांचा दंड व्हावा यासाठी विधानसभेत कायदा करण्यात यावा अशी मागणी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी यांचेकडे केली आहे तसेच या मागणीसाठी सदर शेतकरी मंत्रालयावर धडक देण्याच्या तयारीत आहे.दिंडोरी तालुक्यातील दहावा मैल परिसरातील एक एक्स्पोर्ट कंपनीने उधारीवर द्राक्ष घेत शेतकऱ्यांना धनादेश दिले मात्र ते वटले नाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुमारे पन्नास शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलीस स्टेशनला अर्ज दिला पाच शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून सहा व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होत त्यांना अटक झाली .दरम्यान शेतकऱ्यांना फसविण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने याबाबत कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक असून फसवणुकीस आळा घालण्यासाठी कठोर कायदा होण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त करत धनादेश न वटल्यास किमान पाच वर्षांची अजामीनपात्र शिक्षा व दहा लाखांचा दंड व्हावा अशी कायद्यात सुधारणा व्हावी त्यासाठी विधानसभेत कायदा व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

रघुनाथ पाटील,शरद मालसाने,सुनील शिंदे आदी विविध शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतेच कृषी मंत्री दादा भुसे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पोलीस अधीक्षक सचिन पाटील,खासदार संभाजी राजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेत तर पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची व भविष्यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Policeपोलिसagricultureशेती