शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाकडून शेतकऱ्यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:22 IST

: भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार बुºहान शेख याने स्वत:च्या वडिलांसह दाजीच्या मदतीने वडाळागाव चौफुली परिसरात विहितगाव येथील शेतकऱ्यांना शनिवारी (दि.२०) रात्री बारा वाजेच्या सुमारास मारहाण क रत त्यांच्याजवळील ३ हजार रुपये काढून घेत रिक्षातून पोबारा केला होता.

इंदिरानगर : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार बुºहान शेख याने स्वत:च्या वडिलांसह दाजीच्या मदतीने वडाळागाव चौफुली परिसरात विहितगाव येथील शेतकऱ्यांना शनिवारी (दि.२०) रात्री बारा वाजेच्या सुमारास मारहाण क रत त्यांच्याजवळील ३ हजार रुपये काढून घेत रिक्षातून पोबारा केला होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयित बुºहान यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी साडेबारा वाजेच्या सुमारास संजय होनाजी काळे (रा. विहितगाव) व पंढरीनाथ गायकवाड हे दोघे शेतकरी ट्रॅक्टरचालक सुरेश जुंद्रेच्या ट्रॅक्टरमध्ये वडाळागावातील म्हशीच्या गोठ्यामध्ये चारा विक्री करण्यासाठी आले होते. त्यावेळी वडाळा चौफुलीवर त्यांच्यासमोर बुºहान याने त्याच्या ताब्यातील रिक्षा (एमएच १५, एफ यू १४२२) थांबविली. रिक्षामधून तिघांनी उतरून ट्रॅक्टरवरील शेतकºयांना बळजबरीने खाली ओढत मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दुपारी बुºहान यास अटक केली. त्याचे वडील व दाजी अद्याप फरार आहे. बुºहान यास दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही तो सर्रासपणे शहरात वावरत होता.मध्यरात्रीचा रिक्षा ‘थांबा’वडाळागावात निम्म्याहून अधिक लोक रिक्षा व्यवसाय करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवितात. रिक्षाचा थांबा वडाळागावात मुख्य खंडोबा चौकात आहे. मध्यरात्री चौक सामसूम झालेला असताना वडाळागावाच्या चौफुलीवर महारुद्र हनुमान मंदिर व जॉगिंग ट्रॅकवर पाच ते सहा रिक्षा येऊन थांबत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. या रिक्षांकडे गस्तीवरील पोलीस दुर्लक्ष करतात. रिक्षाचालक सर्रासपणे मद्यप्राशन करून आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग करतात. तसेच काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक मारहाण करून नागरिकांना लुटण्यापर्यंत मजल मारत असल्याने पोलिसांनी मध्यरात्रीचा हा रिक्षा ‘थांबा’ बंद करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिस