शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

सटाणा तहसीलवर शेतकºयांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:14 IST

पीक विम्याच्या रक्कमेवरून येथील तहसील कार्यालयावर हल्लाबोल करत जाब विचारला. यावेळी शेतकरी आणि अधिकाºयांमध्ये वादावादी झाली तर विमा कंपनीच्या अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकºयांनी तब्बल तासभर गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत विमा कंपनीच्या प्रमुख अधिकाºयांची बैठक मंगळवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात बोलाविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शेतकरी माघारी फिरले .

ठळक मुद्देपीकविम्यावरुन गोंधळ : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर माघारी, आज बैठक

सटाणा : पीक विम्याच्या रक्कमेवरून येथील तहसील कार्यालयावर हल्लाबोल करत जाब विचारला. यावेळी शेतकरी आणि अधिकाºयांमध्ये वादावादी झाली तर विमा कंपनीच्या अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकºयांनी तब्बल तासभर गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत विमा कंपनीच्या प्रमुख अधिकाºयांची बैठक मंगळवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात बोलाविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शेतकरी माघारी फिरले .बागलाण तालुक्यात तब्बल साडेपाच हजार शेतकºयांनी पीकविमा काढला आहे. यंदा अवकाळी पावसामुळे मका ,बाजरी, कांदा ,कडधान्य,डाळिंब, द्राक्ष पिकाची अक्षरश: माती झाली. असे भयावह चित्र असताना पिक विमा कंपन्यांनी सपशेल हातवर केल्याचे अनुभवयाला मिळत असल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्या पाशर््वभूमीवर सोमवारी (दि.१७) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी शेतकरी प्रतिनिधी बिंदूशेठ शर्मा ,तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, एसबीआय विमा कंपनीचे प्रमुख साहेबराव पाचपुते, एआयसीएल कंपनीचे प्रतिनिधी कमलाकर पाटील यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीची माहिती मिळताच तालुक्यातील ३०० च्यावर शेतकºयांनी तहसील कार्यालयावरच हल्लाबोल केला. गेल्या वर्षी म्हणजे २०१८-१९ च्या शासन परिपत्रकानुसार पिक विम्यासाठी योग्य नियम व अटी असतांना यंदा मात्र पिक विमा कंपन्या पोसण्यासाठी चक्क जाचक नियम व अटी लादल्यामुळे शेतकºयांची एकप्रकारे लूट केली जात केली जात असल्याची संतप्त भावना व्यक्त करत अधिकाºयांना धारेवर धरले. यावेळी विमा कंपन्याचा निषेध व्यक्त करत शासनाने जारी केलेले परिपत्रक रद्द करावे अन्यथा मंगळवारी अधिकाºयांसमोर परिपत्रकाची होळी करण्यात येईल असा इशारा संतप्त शेतकºयांनी दिला.शासन परिपत्रक रद्द करण्याबरोबरच संबधित अधिकारी आल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही अशी ठाम भूमिका उपस्थित शेतकºयांनी घेतल्याने तहसीलदारांच्या दालनात एकच गोंधळ उडाला. तहसीलदार इंगळे-पाटील व पोलीस यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप करून शेतकºयांना शांतकेले. याप्रसंगी स्वाभिमानीचे दीपक पगार, दीपक ठोके, निलेश सावंत ,योगेश कोर, भूषण कोर ,योगेश सूर्यवंशी, विलास दंडगव्हाळ, संदीप पवार, हेमंत सोनवणे, दिलीप रौंदळ, दीपक रौंदळ, रत्नाकर सोनवणे, मनोहर देवरे, रु पाली पंडित आदी उपस्थित होते.विमा कंपन्यांविरूद्ध संतापयंदा फळपीक विम्यासाठी शेतकºयाने ६०५० व केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी प्रत्येकी २०५० रु पये विमा कंपन्यांनी अदा केल्याने तालुक्यातील शेतकºयांना डाळिंब पिकासाठी अवघे ११ हजार प्राप्त झाल्याचे उघडकीस आल्याने शेतकºयांची फसवणूक झाल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. यावेळी संबंधित अधिकाºयांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने विम्याच्या वाट्यात कपात केल्याचे सांगून त्यामुळेच पीकविम्याच्या संरक्षण रकमेत कपात झाल्याचे सांगितल्याने शेतकºयांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :StrikeसंपCrop Loanपीक कर्ज