शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कळवणला शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 18:01 IST

कळवण : शेतकरी, शेतमजुर व व्यापारी यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) सकाळी कळवण बस स्थानकातील श्री गुरुदेव दत्त मंदिरात शेतकरी संघटनेच्यावतीने निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळींसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देरास्ता रोको आंदोलन करण्यात येईल

कळवण : शेतकरी, शेतमजुर व व्यापारी यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) सकाळी कळवण बस स्थानकातील श्री गुरुदेव दत्त मंदिरात शेतकरी संघटनेच्यावतीने निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळींसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकºयांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या स्मृतिदिन साजरा करून कोरडा दुष्काळ व ओला दुष्काळात होरपळणाºया शेतकरी, शेतमजूर व व्यापारी यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी कळवण सकाळी ११ वाजता शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार व तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कळवण तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.शेतकºयांचे संपूर्ण कर्ज व वीजबिल मुक्ती करावी, कोरड्या व ओल्या दुष्काळामध्ये नुकसान झालेल्या पिकांची भरपाई म्हणून हंगामी पिकांना एकरी ३० हजार व फळबागांना एकतरी १ लाख रुपये अर्थसहाय्य मिळावे, शेतीमाल व्यापारातील सहकारी हस्तक्षेप कायमस्वरूपी बंद करून शेतकºयांना व्यापार स्वातंत्र्य द्यावे व महाराष्ट्रातील सर्व शेतमाल नियममुक्ती करावा, जगभरात तयार असणारे नवीन संशोधीत जीएम तंत्रज्ञानाची बियाणे वापरण्यास परवानगी द्यावी, एफएक्यु ची न लावता सर्व बाजार समित्यांमधून हमीभाव खरेदी करण्यात यावे, मागील वर्षात जाहीर झालेल्या दुष्काळी अनुदानाची मदत ताबडतोब शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात यावी या मागण्यासाठी निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले.शासनाने निर्बंधमुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरीत मान्य न केल्यास रविवारी (दि.२२) शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे बाळासाहेब शेवाळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी धनंजय पवार, अशोक पवार, कौतिक पगार, अंबादास जाधव, कारभारी आहेर, शांताराम जाधव, कुबेर जाधव, राजेंद्र भामरे, निंबा पगार, विलास रौंदळ, विठोबा बोरसे, रामा पाटील, घनशाम पवार, राजेंद्र पवार, रत्नाकर गांगुर्डे, चंद्रकांत पवार, रामराव पगार, मधुकर वाघ, हरिभाऊ वाघ, कौतिक गांगुर्डे, ललित आहेर, संदिप वाघ, किशोर पवार, दिलीप शेवाळे, अनिल रौंदळ, भिला आहेर, गोरख आहेर, विजय रौंदळ, भिला पवार, नितीन पवार, नरेंद्र पवार, राजेंद्र पगार आदीसर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते .

टॅग्स :Shetkari Jagar Manchशेतकरी जागर मंचFarmerशेतकरी