शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

रस्त्यावरील धुळीने शेतकऱ्यांचे हाल पे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:36 IST

पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव : शिर्डी-सुरत महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पिंपळगाव बसवंत परिसरातील वणी चौफुली, मुखेड फाटा आणि अंतरवेली फाटा या ठिकाणी सतत अपघात घडतात. या ठिकाणच्या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे अपघाताबरोबर शेतमालाचेही नुकसान होत आहे. सततच्या उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देवी मंदिर परिसरातील वस्तीलगत भूमिगत नाल्यासाठी ५ फुटाच्या अधिक खोल नाली गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खोदून ठेवल्या आहेत. गटारीत डासांची उत्पत्ती वाढली असून, डेंग्यूसारखे साथरोग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे व नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. (०२ पिंपळगाव २)............................................................................द्राक्ष उत्पादक हवालदिल....परिसरात रस्त्याचे व गटार नालीचे काम अपूर्ण असल्यामुळे धुळीचे व घाणीचे साम्राज्य वाढले आहे. परिसरातील द्राक्षबागांवर उडणाऱ्या मातीचा धर बसला आहे. त्यामुळे द्राक्ष पिकांना मोठा फटका बसणार असल्याने शेतकरीवर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.गटाराची नाली ठरतेय जीवघेणीवस्तीलगत असलेले गटारबांधणीसाठी अतिक्रमण काढून तीन महिने झाले. पावसात सांडपाण्याचा त्रास नागरिकांनी सहन केला, मात्र आता त्याच सांडपाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कोरोनाबरोबरच डेंग्यूसारख्या आजाराला आमंत्रण मिळत आहे.नालीसाठी आणलेले पाइपदेखील ठेकेदार परत घेऊन जात असल्याने नागरिकांना कडून नाराजी व्यक्त केली जात आहे .कासव गतीच्या कामामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाबरोबरच डेंग्यूसारख्या आजाराने थैमान घातले आहे. शहरातून गेलेल्या रस्त्याचे काम जलद गतीने करावे, अन्यथा जनआंदोलन छेडून रस्ता रोको केला जाईल. प्रशासनाचा निषेध नोंदविला जाईल.दत्तू झनकर, उलगुलान सेनाकोरोनामुळे रस्ताचे काम रखडले होते, आता काम सुरू झाले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाईल.-माणिक गाडे, रस्ते इंजिनिअर, शिर्डी-सुरत मार्ग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDust stormधुळीचे वादळ