शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

विज पुरवठ्यातील बदलामुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 18:31 IST

तरसाळी : ग्रामीण भागातील विजेच्या वेळापत्रकात विज वितरण कंपनीकडून बदल करण्यात आला असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून आठवड्यातील चार दिवस, रात्री आठ ते सकाळी सहा यावेळेस थ्री फेज वीज वीज पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून महावितरण विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरात्री विजपुरवठा : शेतकरी वर्गातून महावितरण विरोधात संताप

तरसाळी : ग्रामीण भागातील विजेच्या वेळापत्रकात विज वितरण कंपनीकडून बदल करण्यात आला असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून आठवड्यातील चार दिवस, रात्री आठ ते सकाळी सहा यावेळेस थ्री फेज वीज वीज पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून महावितरण विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे.राज्य सरकार शेती आणि शेतकरी यांच्याबाबत घेतलेले काही निर्णय हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असून पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यासाठी जिल्ह्यामधील अनेक तालुक्यातील शेतकºयांना रात्रीचे काम करावे लागत आहे.रात्री होणाºया थ्री फेज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरणार आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नदीकाठी तसेच शेतात मोठे गवत झाले आहे. रात्रीच्या वेळेस अशा गवतातून जाऊन कृषी पंप सुरू करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.साप, विंचू यासह हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याला रात्रीच्यावेळी शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे.उद्योग धंदयाच्या तुलनेत शेतीसाठी कमी प्रमाणात वीज दिली जाते. दिवसाला सात ते आठ तास वीज पुरवठा उपलब्ध होत असता,े त्याच वेळी शेतकºयांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यातच भरात भर म्हणजे दर महिन्याला विजेच्या वेळापत्रकात बदल करून शेतकºयांना भेटी देण्याचे काम महावितरणकडून होत असल्याचे मत शेतकºयांनी व्यक्त केले आहे. परिणामी शेतकरी वर्ग विज वितरण कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेला हा बदल अजब स्वरूपाचा आहे. दिवसभरात शेतात काबाडकष्ट करून शेतकºयांना रात्रीच्या या बदलामुळे जागरण करावे लागत असून, यामुळे शेतकºयांची झोपही आता पारखी झाली आहे.- कपिल सोनवणे, शेतकरी, औंदाणे.रात्री येणारी वीज शेतकरी वर्गासाठी तोट्याची आहे. दिवस उजाडण्याच्या आधीच वीज जाते यामुळे शेतात राहणाºया महिलांना पाणी भरण्यासाठी रात्रीच जावे लागते. तर शेतकºयांना कृषी पंप बंद करण्यासाठी जावे लागत आह.े सरकार आणि वीज कंपनी शेतकºयांच्या जीवाशी खेळत आहे म्हणून विजपुरवठ्याच्या वेळेत बदल करून दिवसा ३ ते ४ तास वीजपुरवठा होईल असा बदल करावा.- तुषार खैरनार, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना.