पाटोदा : पुढील वर्षी निवडणुका असल्याने शेतमालाला तसेच कांद्यास भाव मिळेल व तसा आजवरचा अनुभव असल्याने शेतकरी वर्गाने चाळीत साठवून ठेवलेला हजारो क्विंटल कांद्यास कवडीमोल भाव मिळत आहे. खर्चापेक्षा काही पटीने कमी भावातकांदा विकावा लागत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसत आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्याने शासन शेतकरी हिताचे निर्णय घेईल अशा आशेवर शेतकरी वर्गाने कांदा साठवून ठेवला मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे तसेच मध्यंतरीच्या बेमोसमी पावसाने साठवून ठेवलेल्या कांद्यास पाणी लागल्याने चाळीतील हजारो क्विंटल कांदा सडून गेल्यामुळे शेतकरी वर्गास हा कांदा उकिरड्यावर फेकून द्यावा लागत असल्याने शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे.त्याचप्रमाणे यावर्षीचा लाल कांदा तसेच रांगडा कांदा बाजारात आला, मात्र या कांद्यासही अल्पसा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच त्यांना प्रतीक्विंटलला एक हजार रु पये अनुदान देण्यात यावे किंवा बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येऊन कांदा हमी भावाने खरेदी करावा अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.चौकट.....भाव मिळेल या आशेवर गेल्या नऊ दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागला आहे. आणि जो कांदा चांगला आहे, त्यालाही कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उकिरड्यावर फेकून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही.- भास्कर नाना शेळके, कांदा उत्पादक शेतकरी, ठाणगाव.गेल्या काही वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे मुबलक पाणी पुरवठा नसतानाही कांदा पीक जगविण्यासाठी तुषार सिंचन तसेच ठिबकने पाणी पुरवठा करून तसेच प्रसंगी टँकरने पाणी आणून पीक जगवले. मात्र उत्पादित मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शासनाने शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्यास अनुदान द्यावे.रवींद्र बैरागी, कांदा उत्पादक शेतकरी, दहेगाव, पाटोदा.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याच्या कोणत्याच मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे शासनाने बाजार हस्तक्षेप योजना राबवावी विक्र ी केलेल्या कांद्यास प्रति क्विंटल एक हजार रु पये अनुदान द्यावे.संजय बनकर जि. प. सदस्य तथा कृ. उ. बा.समिती संचालक, येवला.
चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 19:07 IST
पाटोदा : पुढील वर्षी निवडणुका असल्याने शेतमालाला तसेच कांद्यास भाव मिळेल व तसा आजवरचा अनुभव असल्याने शेतकरी वर्गाने चाळीत ...
चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडल्याने शेतकरी संकटात
ठळक मुद्देकवडीमोल भाव : बाजार हस्तक्षेप योजना राबवण्याची मागणी