शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
3
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
4
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
5
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
6
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
7
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
8
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
9
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
10
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
11
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
12
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
13
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
14
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
15
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
16
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
17
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
18
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
19
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
20
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?

बियाणे सदोष निघाल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:41 IST

सिन्नर : मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने उजनी परिसरात तसेच सिन्नरच्या पूर्व भागात पेरण्यांची लगबग सुरू आहे. या भागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील उजनी परिसरात पेरणी केलेले नामांकित कंपनीचे बियाणे दीड आठवडा उलटूनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देभरपाईची मागणी : दोन आठवड्यांनंतरही वाढ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने उजनी परिसरात तसेच सिन्नरच्या पूर्व भागात पेरण्यांची लगबग सुरू आहे. या भागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील उजनी परिसरात पेरणी केलेले नामांकित कंपनीचे बियाणे दीड आठवडा उलटूनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.सदर कंपनीने आपल्या तंत्रज्ञामार्फत पेरणी केलेल्या बियाण्याची पडताळणी करावी व झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाण्याला शेतकºयांकडून सर्वाधिक मागणी आहे. उजनी परिसरातील शेतकºयांनी लगतच्या गावांतील कृषी सेवा केंद्रांमधून पेरणीसाठी बियाणे खरेदी केले. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने व खरिपाच्या बाबतीत आशा पल्लवित झाल्याने शेतकºयांनी अनुकूल परिस्थिती पाहून लागलीच या बियाण्याची पेरणी केली.बियाणे पेरणी करताना जमिनीची वाफसा स्थिती उत्तम असल्याने बहुतांश भागात पेरणीचे काम आटोपले आहे. सोयाबीन बियाण्याची उगवण साधारणत चौथ्या-पाचव्या दिवशी दिसून येते. मात्र, तब्बल दहा-बारा दिवस उलटूनही अद्याप बिज अंकुरले नसल्याने शेतकºयांमध्ये चीड निर्माण होणे साहजिक आहे. जमिनीतून सोयाबीनची उगवण होत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.१ उजनी परिसरात अनेक शेतकºयांना हाच अनुभव आला असून अनेक ठिकाणी उगवण झाली असली तरी ती विरळ स्वरूपात आहे. तब्बल एक ते दीड फुटांवर बीज अंकुरल्याचे चित्र अनेक शेतांमध्ये दिसून येत आहे. शेतकºयांनी २४०० रुपये दराने तीस किलो वजनाची लीगल एक्सलंट या कंपनीची सोयाबीन बियाणे बॅग खरेदी केली. शेताची नांगरणी, वखरणी, वेचणी, खतांची मात्रा पेरणीचा खर्च बियाणे न उगवल्याने जवळपास १००टक्के वाया गेला आहे.२ पेरणीनंतर पुरेसा कालावधी उलटूनही बियाणे न उगवल्याने शेतकºयांनी बियाणे खरेदी केलेल्या संबंधित कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधला. बियाण्याबाबत तक्रारी आल्यानंतर संबंधित वितरकांनी कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क साधत बियाणे सदोष असल्याची माहिती दिली. मात्र, अद्यापही सदर कंपनीचा एकही अधिकारी अथवा वितरक बांधापर्यंत फिरकला नसल्याने शेतकºयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात पर्जन्यमान चांगले असून गेल्या हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. या हंगामात या नुकसानीची कसर भरून निघेल अशी शेतकºयांची अपेक्षा असली तरी बियाणे सदोष निघाल्याने त्यावर पाणी फिरले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी