येवला : कांद्याचा वांधा काढीत अनकुटे येथील शेतकरी वाल्मीक गायकवाड यांना कांदा व्यापाºयांने बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे़ याबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही तक्र ार दाखल नाही. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे समाजमाध्यमांमध्ये पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. याबाबत शेतकºयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कांद्यात वांदा ( दुय्यम प्रतीचा कांदा) असल्याचे व्यापाºयाने म्हटल्याने व्यापाºयाच्या खळ्यात खाली केलेला ट्रॅक्टर परत भरून द्यावा अशी विनंती या शेतकºयाने केली. त्याचा राग येऊन व्यापाºयाने कांदा उत्पादक शेतकरी गायकवाड यांना बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर बराच वेळ शेतकरी खळ्यात पडून होता. जखमी शेतकºयाला खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. येवल्यात एका कांदा व्यापाºयाने शेतकºयाला जखमी होईपर्यंत मारहाण केली. कानशिलात वर्मी घाव लागल्याने शेतकºयाला उलट्या झाल्या. दरम्यान दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मारहाण झालेल्या शेतकºयाने तक्रार का दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
कांदा व्यापाºयाकडून शेतकºयाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:55 IST
येवला : कांद्याचा वांधा काढीत अनकुटे येथील शेतकरी वाल्मीक गायकवाड यांना कांदा व्यापाºयांने बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे़
कांदा व्यापाºयाकडून शेतकºयाला मारहाण
ठळक मुद्देअद्याप पोलिसांत कोणतीही तक्र र दाखल नाहीकानशिलात वर्मी घाव लागल्याने शेतकºयाला उलट्या