बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:44 AM2020-02-22T00:44:50+5:302020-02-22T01:13:54+5:30

मुंजवाड : सटाणा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंजवाड गावातील मल्हारवाडी शिवारात गुरु वारी (दि.२०) भरदिवसा बिबट्याने एका शेतकºयावर ...

Farmer injured in attack | बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

मुंजवाड येथील मल्हारवाडी शिवारात बिबट्याने शेतकऱ्याला जखमी केल्याने वनविभागाने लावलेला पिंजरा.

googlenewsNext
ठळक मुद्देमुंजवाडची घटना : वनविभागाने लावला पिंजरा

मुंजवाड : सटाणा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंजवाड गावातील मल्हारवाडी शिवारात गुरु वारी (दि.२०) भरदिवसा बिबट्याने एका शेतकºयावर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. शुक्र वारी (दि.२१) परिसरात पिंजरा लावण्यात आला.
ग्रामस्थांनी तीन बिबटे पाहिल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात एकही बिबट्या अद्याप जेरबंद झालेला नसल्याने दहशतीत भर पडली आहे. शहराच्या पश्चिमेला सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावर दोन्ही बाजूने शेतवस्ती आहे. या परिसरात गुरु वारी बिबट्या पाहिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पंडित बच्छाव व अन्य शेतकरी हे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कांद्याच्या शेतात गेले असता केदा भिका गिते (४०) या शेतकºयावर बिबट्याने झेप घेत हल्ला करून जखमी केले. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. साठे यांच्या मार्गदर्शनानुसार वनपाल वैभव अहिरे, जे. शिरसाठ, एन. एम. मोरे, कृष्णा काकुळते, एजाज शेख आदींसह कर्मचाºयांनी ही कार्यवाही केली. याबाबतची खबर मिळताच वनविभागाचे पथक दाखल झाले होते,परंतु अंधार पडल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. प्रत्यक्षदर्शींनी जवळच गव्हाच्या शेतात बिबट्या दडून बसल्याचे सांगितले होते, परंतु तो न मिळाल्याने परिसरात दहशत आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न झाला.

Web Title: Farmer injured in attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.