शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वीजेचा धक्का लागून शेतकरी पिता- पुत्राचा मृत्यू; परिसरात पसरली शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2023 20:37 IST

आदल्या दिवशी झालेल्या पावसाने शॉर्टसर्किट होऊन तारेतील विद्युत प्रवाह वीज मोटरीमध्ये उतरलेला होता.

- अमृत कळमकर

खडकी (ता. मालेगाव, जि. नाशिक) : शेतातील विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्यासह त्याच्या वडिलांचाही वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथे घडली आहे. पिता- पुत्राच्या या अपघाती मृत्यूमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.सध्या कांदे काढणीचा हंगाम सुरू आहे. खडकी येथील समाधान पंढरीनाथ कळमकर (३०) हा तरुण शेतकरी कांदे काढण्यासाठी सकाळी ८ वाजताच कुटुंबासह शेतात गेला होता. तेथे असलेल्या मजुरांसाठी पाणी आणण्यासाठी तो विहिरीवर गेला.

आदल्या दिवशी झालेल्या पावसाने शॉर्टसर्किट होऊन तारेतील विद्युत प्रवाह वीज मोटरीमध्ये उतरलेला होता. ही बाब लक्षात न आल्याने समाधान याने वीजेची मोटार सुरू करताच त्याला वीजेचा जोरदार झटका बसला. यावेळी त्याने मदतीसाठी हाक दिल्याने शेजारीच असलेल्या वडिलांनी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हातानेच मुलाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही वीजेचा जोरदार धक्का लागला. यामुळे समाधान तसेच पंढरीनाथ पांडुरंग कळमकर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या दोघांचे मृतदेह मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. मृत पंढरीनाथ यांच्या पश्चात पत्नी आहे. तसेच समाधान यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे. या परिसरामध्ये अनेक ठिकाणी वीजवाहक तारा खांबांवर लोंबकळत असून त्याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याची परिसरातील शेतकऱ्यांची तक्रार आहे. शासनाने कळमकर कुटुंबास आर्थिक मदत देण्याची मागणीही परिसरातून करण्यात येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू