शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

उमराळे सोसायटीवर शेतकरी विकास पॅनल

By admin | Updated: July 14, 2016 00:21 IST

निवडणूक शांततेत : १३ जागांवर निर्विवाद विजय मिळवत सत्ता कायम

दिंडोरी : तालुक्यातील राजकीयदष्टया संवेदनशील असणाऱ्या उमराळे बुद्रूक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कादवा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जे. डी. केदार, सोसायटीचे अध्यक्ष, डॉ, पुंडलिक धात्रक, रामदास, धात्रक, माजी उपसरपंच संजय केदार, मदन केदार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर निर्विवाद विजय मिळवत सत्ता कायम राखली. शेतकरी विकास पॅलनचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- सर्वसाधारण कर्जदार गटातून हिरामण भाऊ कडाळी (२४६), पांडुरंग शंकर केदार (२९३), मदन बाबूराव केदार (२५९), रामचंद्र महादू केदार (२७३), सचिन जगन्नाथ केदार (२६९), तानाजी वाळू धात्रक (२६२), रामदास शिवराम धात्रक (२७७), कचू तुकाराम सोनवणे (२४९) व इतर मागास प्रवर्गातील एका जागेवर वसंत बाबूराव थेटे (२८९), महिला राखीव गटातून लताबाई संजय केदार (२६७), विठाबाई विश्वनाथ गामणे (२५८), भटक्या जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातील एका जागेवर डॉ. पुंडलिक भीमाजी धात्रक (२७१), अनूसूचित जाती/जमाती गटातून काशीनाथ आबाजी पगारे (२६६) हे उमेदवार विजयी झाले.जय जवान जय किसान पॅनलचे पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे- हरिदास संतू सोनवणे (२०२), बळवंत यशवंत थेटे (१८४), बाळासाहेब दामोधर केदार (१९५), शिवाजी तुकाराम धात्रक (१९७), राजाराम मुरलीधर थेटे (१६६), दिलीप मोहन पगारे (१७३), कैलास दामोदर केदार (१७३), शशिकांत नामदेव गामणे (२०५), महिला राखीव- सीताबाई भास्कर सोनवणे (२२४), सुशीला शांताराम पाटील, इतर मागास प्रवर्ग- विष्णू पंढरीनाथ थेटे (१८८), अनुसूिचत जमाती- वसंत पंढरीनाथ भोये (२०६), भटक्या विमुक्त जाती/जमाती- आदिकराव केदार (२१०) निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. निवडणूकप्रक्रिया शांततेत पार पडली. (वार्ताहर)