नाशिक : नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ पर्वणी असल्याने रक्षाबंधनासारखा महत्त्वाचा सण प्रशासनाच्या नियोजनामुळे अघोषित संचारबंदीच्या कात्रीत सापडला आहे. पर्वणीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून, अंतर्गत आणि बहिर्गत वाहनतळांमुळे जिल्हावासीय तसेच बाहेरून येणारे नागरिक वेठीस धरल्याचे चित्र आहे.श्रावण महिन्यातील पौर्णिमा ‘राखी पौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. हा दिवस ‘रक्षाबंधन’ म्हणूनही ओळखला जातो. यादिवशी बहीण भावाला रेशमी धागा बांधून आपल्या रक्षणासाठी एक प्रकारचे रक्षासूत्र बांधत असते.रक्षाबंधनासाठी पुणे, धुळे, जळगाव, अहमदनगर, मुंबई, ठाणे, जव्हार, पालघर, डहाणू आदि भागांत जाणाऱ्या आणि या भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. रक्षाबंधन शनिवारी आल्याने विकेण्ड तसेच शनिवारी औद्योगिक क्षेत्राला असणारी सुटी यामुळे नागरिकांनी बनवलेल्या प्लॅनची पूर्णच वाट लागल्याने नाराजीचा सूर नाशिककरांमध्ये बघायला मिळतो आहे.सिंहस्थाच्या नियोजनामुळे राखी विक्रेत्यांसह कुरिअर व्यावसायिकांची उलाढाल ठप्प झाली आहे. (प्रतिनिधी)
बहीण-भावाची होणार ताटातूट
By admin | Updated: August 28, 2015 23:36 IST