शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

दीड दिवसाच्या गणरायांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 01:03 IST

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ हा जयघोष करून रविवारी पंचवटीतील रामकुंड येथे नाशिककर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. महानगरपालिकेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गणेशमूर्तींचे संकलनही करण्यात आले.

ठळक मुद्देपारंपरिक पूजेनंतर विसर्जन : महानगरपालिकेकडून उपाययोजना

नाशिक : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ हा जयघोष करून रविवारी पंचवटीतील रामकुंड येथे नाशिककर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. महानगरपालिकेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच पर्यावरणपूरक विसर्जनासाठी गणेशमूर्तींचे संकलनही करण्यात आले.यावर्षी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा होत असला तरी भाविकांचा उत्साह कणभरीही कमी झालेला नाही त्यामुळेच गणेशभक्तांनी दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पूजाविधी करून लाडक्या बाप्पांना निरोप दिला. गंगापूर धरणातून विसर्ग केला जात असल्याने मनपा व जिल्हा प्रशासनाच्या वतीने विर्सजनासाठी भाविकांनी नदीवर गर्दी करू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे गणेशभक्तांनी काळजी घेत बाप्पांचे विसर्जनकेले.अनेकांनी शाडू मातीच्या बाप्पांची प्रतिषपणा केली होती. त्यांनी परंपरागत पूजा नैवद्य देवून बाप्पाचे घरीच विसर्जन केले. दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यापूर्वी गणेशभक्तांनी विधिवतपणे गणेशाचे पूजन करून महाआरती व मोदकाचा नैवेद्य चढवून गणरायाकडे सर्व काही मंगल राहू दे, करोना संकट टळू दे, अशी प्रार्थना करून बाप्पांचे नदीपात्रात विसर्जन करून निरोप दिला.गणेशोत्सवात कोणी दहा दिवस, तर कोणी ७ दिवसांपर्यंत, कुणी दीड दिवसाच्या गणेशाची प्रतिष्ठापना करत असतात. रविवारी गणपती प्रतिष्ठापनेचा दीड दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्याने भाविकांनी गंगाघाटावर गोदावरी नदीपात्रात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करून दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला.

टॅग्स :NashikनाशिकGaneshotsavगणेशोत्सव