शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

विख्यात गणितज्ज्ञ दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:33 IST

नाशिक- विख्यात गणितज्ज्ञ आणि पेठे हायस्कूलचे माजी शिक्षक दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.२९) सकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.  गणितासारखा विषय  सहज सोप्या पध्दतीने शिकवणारे आणि अन्य अनेक संस्थांशी निगडीत असलेल्या गोटखिंडीकर यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

ठळक मुद्देनाशिक मध्ये अंत्यसंस्कारकापरेकरांबर केले हेाते कामकाजदेशविदेशातील परीषदांमध्ये सहभाग

नाशिकविख्यात गणितज्ज्ञ आणि पेठे हायस्कूलचे माजी शिक्षक दिलीप कृष्णाजी गोटखिंडीकर यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.२९) सकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.  गणितासारखा विषय  सहज सोप्या पध्दतीने शिकवणारे आणि अन्य अनेक संस्थांशी निगडीत असलेल्या गोटखिंडीकर यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

दोन महिन्यांपूर्वी हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. त्यानंतर पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यंसस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पुष्पा गोटखिंडीकर, मुलगा अजेय, मुलगी अर्चना दीक्षीत यांच्यासह सून, जावई, नातवंडे असा परीवार आहे.

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठेे हायस्कूलमध्ये अध्यापन करतानाच गणित विषय शिकवण्याच्या त्यांच्या कौशल्याने ते विद्यार्थीप्रिय होते. शिक्षण क्षेत्राशी संबंधीत अनेक संस्थांवर त्यांनी काम केले. थोर गणितज्ज्ञ (कै.) दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांच्या बरोबर त्यांनी नऊ वर्षे कार्य केले. १९८४ पासून ते इंडीयन मॅथेमँटीकल सोसायटीचे ते सदस्य होते. त्याच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळ, महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ, मराठी विज्ञान परीषद अशा अनेक संस्थांवर त्यांची पदाधिकारी आणि तज्ज्ञ म्हणून काम केले. राज्य शासनाच्या भास्कराचार्य गणित नगरीचे ते संयोजक समिती सदस्य होते. त्यांनी एकुण ७० पुस्तके लिहीलेले असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाबरोबरच अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी दृकश्राव्य साधनांची निर्मिती केली. तसेच दिल्ली, कोटा बरोबरच तुर्कस्थान, फिनलँड येथे गणित आणि शिक्षण विषयक परीषदेतही त्यांचा सहाभाग होता.

 

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण