शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब कल्याण उपकेंद्र कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:14 IST

जळगाव नेऊर : येथे सव्वा कोटी रु पये खर्च करून बांधण्यात आलेले सुसज्ज कुटुंब कल्याण उपकेंद्र कर्मचाºयांच्या प्रतीक्षेत आहे. ...

ठळक मुद्देगैरसोय : रु ग्णालयाची सेवा सुरू करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

जळगाव नेऊर : येथे सव्वा कोटी रु पये खर्च करून बांधण्यात आलेले सुसज्ज कुटुंब कल्याण उपकेंद्र कर्मचाºयांच्या प्रतीक्षेत आहे. येथे त्वरित कर्मचाºयांची नेमणूक करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेमार्फत येथे सुसज्ज दुमजली कुटुंब कल्याण उपकेंद्र बांधण्यात आले आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते १९ जानेवारी २०१९ रोजी या उपकेंद्राचे उद्घाटन झाले. स्वागतकक्ष, तपासणी कक्ष, शस्रक्रि या कक्ष, औषध विभाग, रु ग्ण उपचार कक्ष व डॉक्टरांसाठी दुसºया मजल्यावर स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. उपकेंद्राच्या परिसरात पथदीप बसविण्यात आले आहे, परंतु ते बंद अवस्थेत आहेत. या उपकेंद्रासाठी आजपर्यंत एकाही कर्मचाºयाची नेमणूक केलेली नसल्यामुळे हे रुग्णालय धूळ खात पडले आहे. विघ्नसंतुष्ट लोकांनी या रुग्णालयाच्या खिडक्यांच्या आकर्षक काचाही फोडल्या आहेत. तसेच रुग्णालयाच्या छतावर पाण्यासाठी बसविण्यात आलेली पाण्याची टाकीही अज्ञाताने चोरून नेली आहे. या इमारतीस पक्के कुंपण नसल्याने गावातील महिला व पुरुष इमारतीवर शौचालयास बसतात.सामान्य रु ग्णांना मिळेल दिलासानाशिक-औरंगाबाद महामार्गालगत हे गाव असल्याने परिसरातील अनेक गावांचा या गावाशी संबंध येतो. दवाखाना सुरू झाल्यास परिसरातील महिलांच्या प्रसूतीची उत्तम सोय या ठिकाणी होईल. तसेच इतर आजारांवरही प्रथमोपचार या ठिकाणी केले जातील. त्यामुळे सामान्य रु ग्णांना दिलासा मिळेल. रु ग्णालय असूनही अधिकारी व कर्मचारी नसल्याने परिसरातील महिलांना तालुक्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी जावे लागते. अशा रु ग्णालयांचा खर्च सामान्य कुटुंबांना पेलवत नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या उपकेंद्रासाठी अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देऊन रु ग्णालयाची सेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.जिल्हा परिषदेने महिलांच्या प्रसूतीसाठी येथे सुसज्ज असे कुटुंब कल्याण उपकेंद्र उभारले आहे. या उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची लवकरात लवकर नेमणूक करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे शासनदरबारी प्रयत्न केले जातील व लवकरच हे रुग्णालय सेवेत दाखल होईल.- सुमय्या पटेल, सरपंच, एरंडगाव बुद्रुक.

टॅग्स :Healthआरोग्य