शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीच्या योजनांना विरोध चुकीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:05 IST

स्मार्ट सिटी योजना ही भांडवलदारांसाठी नसून रस्ते, पाणी, बससेवा यासारख्या मूलभूत आणि शाश्वत विकासाची कामे होणार असल्याने त्यास विचार करण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.

नाशिक : स्मार्ट सिटी योजना ही भांडवलदारांसाठी नसून रस्ते, पाणी, बससेवा यासारख्या मूलभूत आणि शाश्वत विकासाची कामे होणार असल्याने त्यास विचार करण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असूनही नाशिकचा अपेक्षित विकास का झाला नाही, नवीन उद्योग का आला नाही याचा विचार केला तर विकासाच्या संकुचित आणि स्वयंकेंद्रित कल्पनेतच विकास रखडल्याचे दिसते. त्यामुळे शहर हिताचा विचार करून विकासाची संकल्पना व्यापक करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.  अ‍ॅड. द. तु. जायभावे प्रतिष्ठानच्या वतीने स्मार्ट सिटी संकल्पना व अंमलबजावणी या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी टॉक विथ कमिशनर कार्यक्रमात ते बोलत होते. स्मार्ट सिटी हे केवळ योजनेचे नाव आहे. त्यात मूलभूत सुविधांच्याच संकल्पना असल्याचे सांगून मुंढे म्हणाले की, तुम्हाला रस्ते हवेत, पाणीपुरवठा, पथदीप, बससेवा हवी असेल तर सर्वच या योजनेत समाविष्ट आहे. एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत महापालिकेने सव्वातीनशे कोटी रुपयांची कामे गावठाण भागात करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी निविदा निघाल्या आहेत. या भागातच नव्हे तर संपूर्ण शहरात चोवीस तास पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे सांगून त्यांनी ३० जून २०१९ पर्यंत शहरात ९० हजार स्मार्ट लाइट लागतील असेही सांगितले. नाशिकचा विकास का होत नाही, कुंभमेळ्यात निधी येऊनही शहराचा कायापालट का होत नाही याचा विचार केला तर दोष लक्षात येतात. समग्र शहराचा विचार केला पाहिजे, असे सांगून मुंढे यांनी आपण महासभेच्या किंवा स्थायी समितीच्या निर्णयांबाबत संघर्ष करतो याचे कारण म्हणजे शहराचा शाश्वत विकास झाला पाहिजे हीच इच्छा आहे. अन्यथा शासकीय वेतन घेऊन आपणही नियमित कामकाज करू शकतो असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. डी.एल. कराड यांनी केले होते. प्रा. मिलिंद वाघ यांनी प्रास्ताविक केले.अनेक मुद्यांचा ऊहापोहआपल्यावर होत असलेल्या विविध आरोपांचे खंडन मुंढे यांनी केले. मनपा अधिनियम ६७ नुसार महासभा असो अथवा स्थायी समिती यापैकी कोणीही काहीही निर्णय घेतले तरी अंमलबजावणी करायची किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार आयुक्तांनाच असल्याचे सांगितले. आपल्या कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करीत असल्याचे पसरविले जाते; मात्र त्यासंदर्भातील कारणे वेगळी आहेत. आपण ११ ठिकाणी कामे केली परंतु तेथे असे का घडले नाही असा प्रश्न त्यांनी केला. मनपातील आस्थापना खर्च, शासनाच्या वेतनापेक्षा अधिक वेतन, नियमांचे पालन न करता झालेली भरती अशा अनेक मुद्द्यांचा ऊहापोह त्यांनी केला.ती शेती कशी?करवाढीच्या विषयावर बोलताना मुंढे यांनी शेती क्षेत्रावर कर लावल्याचा आरोप फेटाळून लावला. शेती क्षेत्र जर ‘यलो झोन’ म्हणजेच रहिवासी क्षेत्रात आले तर ते शेती क्षेत्र कसे म्हणता येईल? असा प्रश्न त्यांनी केला. शेतीवरील कराबाबत आता टीका केली जाते. मात्र, १९९० पासून सिंहस्थात शेतकºयांकडून जमिनी घेण्यात आल्या. त्यांना आजवर मोबदला मिळाला नव्हता किंवा टीडीआर सुद्धा मिळाला नव्हता, तो आपण मिळवून दिल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेSmart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका