शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराची खोटे बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 14:15 IST

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून पोषण आहार येतो मात्र बालकांना तो न देता खोटी बिले अदा करून चिमुकल्यांच्याच टाळूवरचे लोणी काही अंगणवाडी सेविका खात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेवर घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे.

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून पोषण आहार येतो मात्र बालकांना तो न देता खोटी बिले अदा करून चिमुकल्यांच्याच टाळूवरचे लोणी काही अंगणवाडी सेविका खात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेवर घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण आदिवासी भाग असलेल्या आवळी परिसरातील जंगलात अनेक आदिवासी कुटुंब आपला उदरिनर्वाह करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. या वाडी वस्त्यांवर या कुटुंबांची ० ते ६ वयोगटांतील एकूण २४ बालके असून त्यांची शासकीय दप्तरी आवळी,सातूर्ली, ओंडली आदी गावच्या अंगणवाडी केंद्रांत नोंद आहे. एकीकडे राज्य शासन कुपोषणावर मात करण्यासाठी लाखो रु पयांचा निधी देत असताना मात्र तरीही शासनाचा कुठलाही पोषण आहार या बालकांना मिळाला नसल्याची तक्र ार श्रमजीवी संघटनेने घोटी पोलिसांत दाखल केली आहे.--------------------याबाबतची माहिती इगतपुरी गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प च्या संबंधितांना मिळताच प्रकल्प अधिकारी एस एस ढाकणे यांनी ठिकाणी धाव घेऊन पोषण आहार त्या बालकांना दिला. या पुढे नित्यनियमाने पोषण आहार बालकांना दिला जाईल असे स्पष्ट केले. ज्या कुणी अंगणवाडी सेविकेने या बालकांच्या नावे खोटे बिले सादर करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्याची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी केली आहे.---------------------इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यात पोषण आहार बालकांना वेळेवर मिळत नाही. गरीब आदिवासी वाट बघून असतात,त्यांच्या पर्यंत कुणीही पोहोचत नाही. कुपोषण निर्मूलन करण्यासाठी राज्य शासन पोषण आहारावर लाखो रु पयांची तरतूद करते मात्र शासकीय अधिकारी यंत्रणेच्या डोळेझाक पणामुळे ते वडी वस्त्यांवर पोहोचत नाही. खोटी बिले दाखवून फसवणूक केली जाते. कठोर कार्यवाही व्हावी ही अपेक्षा.-भगवान मधे, श्रमजीवी संघटना

टॅग्स :Nashikनाशिक