सटाणा : लाल कांद्याच्या भावात पुन्हा घसरण सुरूच आहे. गुरु वारी सटाणा बाजार समिती आवारात सुमारे पंधरा हजार क्विंटल आवक वाढल्याने प्रति क्विंटल चारशे ते पाचशे रु पयांनी भावात घसरण झाली. सरासरी आठशे रु पये लाल कांद्याला भाव होता. भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे.सटाणा बाजार समिती आवारात या आठवड्यात लाल कांद्याची आवक वाढल्याने भावात कमालीची घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सरासरी तेराशे ते चौदाशे रु पये प्रति क्विंटल लाल कांद्याला भाव मिळाला; मात्र या आठवड्यात कांद्याची आवक सुमारे चार हजार क्विंटलने वाढली आहे. गेल्या चार दिवसात चारशे ते पाचशे रु पयांनी कांद्याच्या भावात घसरण झाली. गुरु वारी सटाण्यात लाल कांद्याची पंधरा हजार क्विंटल इतकी आवक होती. तर सर्वाधिक तेराशे व सरासरी आठशे रु पये कांद्याला भाव मिळाला. कमीत कमी साडेचारशे रु पयांनी कांदा विकला गेला. (वार्ताहर)
सटाण्यात लाल कांद्याच्या भावात घसरण
By admin | Updated: January 21, 2016 22:15 IST