शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २७३ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 01:23 IST

अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांना बसला असून २७३ घरांची वादळात पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला  आहे. या वादळात शाळा तसेच प्राथमिक आरेाग्य केंद्रांचेही नुकसान झाले. गुजरात सीमेलगत असलेल्या पेठ आणि सुरगाणा तालुक्याला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यातील एकूण ९६ गावांमधील नागरिकांना वादळाचा सामना करावा लागला.

ठळक मुद्देवादळी वारा : चक्रीवादळामुळे ९६ गावे बाधित 

नाशिक :  अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांना बसला असून २७३ घरांची वादळात पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला  आहे. या वादळात शाळा तसेच प्राथमिक आरेाग्य केंद्रांचेही नुकसान झाले. गुजरात सीमेलगत असलेल्या पेठ आणि सुरगाणा तालुक्याला या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यातील एकूण ९६ गावांमधील नागरिकांना वादळाचा सामना करावा लागला.‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून जिल्ह्यातील सुरगाण्यासह पाच तालुक्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला होता. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल भागातील काही घाटमाथ्यासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाजदेखील हवामान विभागाने वर्तविला होता. या वादळात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण,  देवळा, चांदवड, निफाड तसेच सिन्नर तालुक्यातील मालमत्तेचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.दीड हजार शेतकऱ्यांना वादळाचा फटका दीड हजार शेतकऱ्यांचे नुकसान सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले. शेतपिकांचे नुकसान झाले तर कांदा चाळीतील कांदादेखील खराब झाला. अनेक तालुक्यांमधील फळबागांचे नुकसान झाले. पेठ तालुक्यातील २०५ हेक्टरवरील आंबा पिकांचे नुकसान झाले तर त्र्यंबेकेश्वर तालुक्यातील ८.८६ हेक्टरवरील आंबा पीकदेखील जमिनीवर आले. सिन्नर तालुक्यातील डाळींब बागादेखील उद्‌ध्वस्त झाल्या.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस