शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:27 IST

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी निर्जंतूक द्रव्याला (सॅनिटायझर) मागणी वाढली आहे. दरम्यान, गोळे कॉलनीतील दोन ठोक औषध विक्रेत्यांनी बनावट सॅनिटायझरचा मोठा साठा विक्रीच्या उद्देशाने केल्याचे छापेमारीत उघड झाले आहे. जिल्हा रुग्णालय व अन्न-औषध प्रशासनाच्या भरारी पथकांनी सलग दोन दिवसांत गोळे कॉलनी व सिडको भागात केलेल्या छापेमारीत १ लाख ६० हजारांचा अवैध सॅनिटायझरचा मोठा साठा जप्त केला आहे.

ठळक मुद्देसिडको, गोळे कॉलनीत संशयित ठोकविक्रेत्यांवर भरारी पथकांचा छापा

नाशिक : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी निर्जंतूक द्रव्याला (सॅनिटायझर) मागणी वाढली आहे. दरम्यान, गोळे कॉलनीतील दोन ठोक औषध विक्रेत्यांनी बनावट सॅनिटायझरचा मोठा साठा विक्रीच्या उद्देशाने केल्याचे छापेमारीत उघड झाले आहे. जिल्हा रुग्णालय व अन्न-औषध प्रशासनाच्या भरारी पथकांनी सलग दोन दिवसांत गोळे कॉलनी व सिडको भागात केलेल्या छापेमारीत १ लाख ६० हजारांचा अवैध सॅनिटायझरचा मोठा साठा जप्त केला आहे.कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझरच्या वापरास प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात बनावट सॅनिटायझरची निर्मिती व विक्रीची शक्यता लक्षात घेता दोन भरारी पथकांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. बनावट सॅनिटायझरची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांच्या नेतृत्वाखाली औषध निरीक्षक डॉ. सुरेश देशमुख, जीवन जाधव, चंद्रकांत मोरे यांच्या भरारी पथकाने शनिवारी गोळे कॉलनीमधील मे. राहुल एन्टरप्रायजेस, मे. आशापुरी एजन्सीच्या दालनात छापे मारले. औषध निरीक्षक सु. सा. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या या कारवाईत बनावट सॅनिटायझरचा विक्रीसाठी साठा केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. सुमारे १ लाख ६० हजारांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. प्रतिबंधित केलेला हा साठा प्रथमदर्शनी विनापरवाना उत्पादित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित विक्रेत्यांची अधिक चौकशी सुरू असून याबाबत माहिती घेण्याचे काम भरारी पथकाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच मे. जयसन एन्टरप्रायजेस या एजन्सीवर भरारी पथकाने छापा मारून बनावट बाटल्यांचा साठा जप्त केला.दोन भरारी पथके कार्यान्वितभरारी पथकांमध्ये एकूण चार सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय, मनपा आरोग्य विभागांचे प्रत्येकी एक डॉक्टरसह औषध विभागाचे दोन औषध निरीक्षक आणि वैद्यमापन शास्त्र विभागाचे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके शहरात कार्यान्वित करण्यात आली असून, बनावट सॅनिटायझरच्या विक्रीसह सॅनिटायझरचा तुटवड्याला कारणीभूत ठरणाºया साठेमारीवरही लक्ष ठेवून आहेत.कच्च्या मालाचा तुटवडासॅनिटायझरचा अचानकपणे वापर वाढल्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत सॅनिटायझर उत्पादक कंपन्यांनाही सरकारकडून निर्देश देण्यात आले आहे; कच्च्या मालाची चणचण असल्याने सॅनिटायझरचे उत्पादनाचे प्रमाण वाढविण्याकरिता अडचणी उद्भवत असल्याचे औषध विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार