शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

राज्यातील बनावट ई-पास विक्र ीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 01:22 IST

‘बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या एका पदाधिकाऱ्यां-कडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर एका व्हायरल ध्वनीफितीच्या आधारे नाशिक क्र ाइम ब्रँच युनिट १ च्या पथकाने बनावट ई-पास विक्र ीचा पर्दाफाश करत मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील रहिवासी असलेला संशयित राकेश सदानंद सुर्वे ऊर्फ कृष्णा (३२) यास गुरुवारी (दि.२७) बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देध्वनीफितीमधील आवाजावरून लावला छडा : संशयित गुहागर येथील रहिवासी

नाशिक : ‘बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या एका पदाधिकाऱ्यां-कडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर एका व्हायरल ध्वनीफितीच्या आधारे नाशिक क्र ाइम ब्रँच युनिट १ च्या पथकाने बनावट ई-पास विक्र ीचा पर्दाफाश करत मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील रहिवासी असलेला संशयित राकेश सदानंद सुर्वे ऊर्फ कृष्णा (३२) यास गुरुवारी (दि.२७) बेड्या ठोकल्या.कोरोना संक्रमणामुळे आंतरजिल्हा तसेच राज्यात प्रवास करण्यावर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून पास प्राप्त करून घेतल्यानंतरच प्रवासाला विविध अटी व शर्तीनुसार परवानगी दिली जाऊ लागली. याचा फायदा काही भामट्यांनी घेत बनावट ई-पास बनविण्याची युक्ती शोधून काढत हजारो ते लाखो रुपये कमाविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ई-पासबाबतची ध्वनीफीत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्हायरल झाली आणि पोलिसांसाठी हाच धागा महत्त्वाचा ठरला. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी याप्रकरणी येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा नोंदविला.तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने नाशिकच्या क्राइम ब्रँच युनिट-१च्या पथकाने ध्वनीफीतमधील आवाजाचा मागोवा घेण्यास सुरु वात केली. त्यावरून तपासाचे धागेदोरे थेट रत्नागिरीच्या गुहागरपासून मुंबईच्या डोंबिवलीपर्यंत जाऊन पोहोचले. संशयित गुहागरला असल्याचे निष्पन्न होताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक बलराम पालकर, दिलीप मोंढे, विशाल देवरे यांचे पथक रवाना केले. व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल ध्वनीफीतमधील आवाज असलेला मोबाइलधारक गुहागर येथील संशयित सुर्वे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत १५ प्रवाशांकडून लॉकडाऊन काळात मुंबई येथून रत्नागिरीला जाण्यासाठी प्रत्येकी २ हजार रु पये घेत पोलिसांच्या नावाने बनावट ई-पास इतर ठिकाणांवरुन काढून दिल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता ई-पास काढण्यासाठी वापर करत असलेला टॅब, मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पालकर करीत आहेत. विशेष बाब म्हणजे हा सुर्वेदेखील मनसेचा गुहागर तालुका सचिव असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.ध्वनीफीतमध्ये पोलिसांच्या नावाने आश्वासनव्हायरल ध्वनीफितीची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. यामध्ये सुर्वे नावाची व्यक्ती प्रत्येकी दोन हजार रु पये स्वीकारून नाशिक पोलिसांच्या नावाने ई-पास देण्याचे आश्वासन देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवून तपासचक्र े फिरविली.वाढदिवसालाच हाती पडल्या बेड्याएकीकडे सोशल मीडियावर सुर्वे याला वाढदिवसाच्या शुभेच्छाच्ाां वर्षाव सुरू असताना दुसरीकडे गुरु वारी त्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या. सुर्वे याचा गुरु वारी २७ आॅगस्ट रोजी वाढदिवस होता आणि याच दिवशी त्याला पोलिसांचे रिमांड भोगण्याची वेळ आली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी