शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

 नाशिक जिल्ह्यात बनावट ताडी विक्रीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 20:00 IST

नाशिक : डिसेंबर महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री विरोधात उघडलेल्या मोहिमेत जिल्ह्यात अद्यापही घातक रसायनांचा वापर करून बेकायदेशीरपणे ताडी विक्री केली जात असल्याची बाब उघडकीस आली असून, ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यातून ४६० लिटर ताडी जप्त करण्यात आल्याने बनावट ताडी विक्रेत्यांची टोळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.साधारणत: दहा वर्षापुर्वी ...

ठळक मुद्देघातक रसायनाचा वापर : ४६० लिटर अवैध साठा जप्त बनावट ताडी विक्रेत्यांची टोळी कार्यरत असल्याचे स्पष्ट

नाशिक : डिसेंबर महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री विरोधात उघडलेल्या मोहिमेत जिल्ह्यात अद्यापही घातक रसायनांचा वापर करून बेकायदेशीरपणे ताडी विक्री केली जात असल्याची बाब उघडकीस आली असून, ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यातून ४६० लिटर ताडी जप्त करण्यात आल्याने बनावट ताडी विक्रेत्यांची टोळी कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.साधारणत: दहा वर्षापुर्वी नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट ताडी विक्री केली जात असल्याची दखल राज्याच्या विधीमंडळाला घ्यावी लागली होती व त्याच्या आधारे संपुर्ण राज्यातच ताडी विक्रीवर बंदी घालण्याची कार्यवाही राज्य सरकारला करावी लागली होती. फुफ्फूसांना छिद्रे पाडणे व हाडे ढिसूळ करणारे क्लोरोहाईड्रेड नावाच्या रसायनाचा मुख्यत्वे वापर करून तयार करण्यात येणाºया ताडीमुळे जिल्ह्यात अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे बनावट ताडीची विक्री शासनाकडून अधिकृत परवाना घेतलेल्या ताडी विक्रेत्यांकडून केला जात असल्याचे त्यावेळी उघडकीस आल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी सेतुरामन चोक्कलिंगम यांनी या प्रकरणी शासनाकडे अहवाल पाठवून ताडी विक्री बंदीची शिफारस केली होती. त्यानंतर जवळपास पाच ते सात वर्षे ताडी विक्रीवर शासनाने बंदी घातली. आता शासनाने ताडी विक्रीबाबत नवीन धोरण तयार करून झाडांच्या संख्येवर ताडी दुकानांचा लिलाव सुरू केला,जेणे करून झाडापासून निर्मित ताडीचीच विक्री केली जाईल परंतु या धंद्यातील माफियांनी त्यावरही तोडगा शोधून बनावट ताडी तयार करणे व तिची विक्री करून मानवी जिवीताशी खेळण्याचा धंदा सुरूच ठेवला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर महिन्यात राबविलेल्या मोहिमेत बनावट ताडी आढळून आल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. साधारणत: मालेगाव, सटाणा, सिन्नर, त्र्यंबकेवर व नाशिक शहरातही काही ठिकाणी बनावट ताडी विक्री केली जात असल्याने अशा अड्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांनीही बनावट ताडीच्या विक्रीला दुजोरा दिला असून, त्याविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सुचना संबंधित निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. ज्या हद्दीत बनावट ताडीची विक्री केल्याचे आढळल्यास त्या भागातील निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला जात असल्यामुळे अधिकाºयांवर दडपण वाढले आहे. मात्र बनावट ताडी तयार करणाºयांचा अद्याप शोध लागू शकलेला ना

टॅग्स :Crimeगुन्हाNashikनाशिक