शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

गॅसगळतीत आपत्ती व्यवस्थापन फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:28 IST

बरोबर पंधरा दिवसांपूर्वी नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे गॅस वाहून नेणाऱ्या टॅँकरची गळती झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात तेल कंपन्यांचे अधिकारी, गॅसगळती रोखणारे पथक, पोलीस, अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून लीलया परिस्थिती हाताळण्यासाठी केलेली कसरत किती लुटुपुटुची होती हे शुक्रवारी राष्टय महामार्गावर गॅस टॅँकर उलटल्याने सहा तासांनंतरही परिस्थिती सामान्य होऊ शकली नाही यावरून स्पष्ट झाले आहे.

नाशिक : बरोबर पंधरा दिवसांपूर्वी नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे गॅस वाहून नेणाऱ्या टॅँकरची गळती झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात तेल कंपन्यांचे अधिकारी, गॅसगळती रोखणारे पथक, पोलीस, अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून लीलया परिस्थिती हाताळण्यासाठी केलेली कसरत किती लुटुपुटुची होती हे शुक्रवारी राष्टय महामार्गावर गॅस टॅँकर उलटल्याने सहा तासांनंतरही परिस्थिती सामान्य होऊ शकली नाही यावरून स्पष्ट झाले आहे. तेल कंपन्यांच्या पथकाने दाखविलेला हलगर्जीपणा व पोलिसांच्या उदासीनतेमुळे राष्टय महामार्गावर तब्बल सहा ते सात तास वाहनचालकांना अडकून पडावे लागल्याच्या घटनेची जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली आहे.शुक्रवारी दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवºहे शिवारात नाशिकहून मुंबईकडे जाणारा गॅस टॅँकर रस्त्यावर उलटल्यामुळे या महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेच्या कारणावरून रोखण्यात आली. दुर्घटनेचे वृत्त ग्रामीण पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळविल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब रवाना करण्यात आले. राष्टÑीय महामार्ग असल्यामुळे या महामार्गावरील वाहनांची संख्या लक्षात घेता, अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत रस्त्यावर वाहने अडकून पडल्यामुळे त्यांनाही तेथपर्यंत जाण्यास अडथळ्यांचा सामना करावा लागला.टॅँकरमध्ये घातक गॅस असल्याने त्यापासून मोठी दुर्घटना टाळता यावी यासाठी तत्काळ मनमाडच्या इंडियन आॅइल कंपनीशी संपर्क साधण्यात येऊन गॅसगळती रोखण्यासाठी सामुग्रीनिशी पथक पाठविण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आल्या, तर त्याचबरोबर महामार्गावरील वाहतुकीची खोळंबा दूर करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी वाडीवºहे पोलीस, ग्रामीण वाहतूक दलालाही सूचना देण्यात आल्या. मनमाडहून निघालेले पथक साधारणत: दीड ते दोन तासांत घटनास्थळी पोहोचणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात या पथकाने हलगर्जीपणा दाखविला.तब्बल साडेचार तासाने पथक घटनास्थळी दाखल झाले तर पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य न ओळखता निव्वळ अपघात म्हणून सदर प्रकाराकडे डोळेझाकपणा केल्याने राष्टÑीय महामार्ग तब्बल सहा तासांपेक्षा अधिक काळ ठप्प झाला. आजवरच्या इतिहासात राष्टय महामार्ग सहा तास ठप्प होण्याची ही पहिलीच घटना मानली जात असून, त्यामुळे महामार्गावर कित्येक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या तर अनेकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करून मानसिक त्रास सहन करावा लागला. आपत्ती निवारण व्यवस्थापनांतर्गत आजवर घेण्यात आलेल्या रंंगीत तालिमीत यंत्रणांनी संभाव्य दुर्घटनांचे प्रात्यक्षिक करताना त्यावर अवघ्या काही मिनिटांत नियंत्रण मिळविले, परंतु खºया दुर्घटनेत ते नापास झाले.महामार्ग ठप्पचा  राम शिंदे यांनाही फटकागॅस टॅँकर उलटून राष्टय महामार्ग तब्बल सहा तासांपेक्षा अधिक ठप्प झाल्याचा फटका अन्य वाहनचालकांप्रमाणे नाशिकच्या दुष्काळी दौºयावर आलेले जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनाही बसला. सिन्नरहून इगतपुरी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राम शिंदे दाखल झाले, परंतु वाडीवºहेच्या पुढे वाहतूक ठप्प झाल्याचे कळताच त्यांना शेणवड खुर्द येथील दौरा रद्द तर करावाच लागला, परंतु नाशिक तालुक्याच्या पाहणीसाठी मंत्र्यांना व त्याच्या ताफ्याला आडमार्गाचा वापर करून नाशिक तालुक्यात पोहोचावे लागले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक