शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस ‘पुन्हा आल्या’ने जल्लोेष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 01:14 IST

विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा शनिवारी (दि.२३) भल्या सकाळी शपथविधी झाल्यानंतर भाजपत उत्साह संचारला.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा शनिवारी (दि.२३) भल्या सकाळी शपथविधी झाल्यानंतर भाजपत उत्साह संचारला. दुपारी कार्यकर्त्यांनी एन.डी. पटेलरोडवरील पक्ष कार्यालयाबाहेर ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून अभूतपूर्व जल्लोष करण्यात आला. पक्षाचे आमदार आणि महापौरदेखील या नृत्य जल्लोषात सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहात अधिकच भर पडली. दरम्यान, एकीकडे हा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे मात्र त्यावर राजकीय पडसाद उमटू नये, या पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेरच कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागला. याशिवाय राजकीय तणाव वाढून शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.राज्यात सत्ता स्थापनेची अनिश्चितता वाढत असतानाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसची नवीन समीकरणे आकारास येत होती. त्याच दरम्यान राजकीय नाट्य रंगले आणि सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपत उत्साह संचारला. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हळूहळू कार्यालयात जमू लागले. नूतन महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागुल, आमदार सीमा हिरे, आमदार अ‍ॅड. राहुल ठाकरे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, वसंत गिते, गिरीश पालवे, सुजाता करजगीकर यांच्यासह अन्य पदाधिकारी दाखल झाले. यावेळी बोलताना सावजी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सकाळपासूनच जल्लोष करण्यास प्रारंभ केल्याचे सांगितले. मात्र, पक्ष कार्यालयासमोर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करायचा असल्याने सर्व कार्यकर्ते गोळा झाले असल्याने हा आनंद साजरा करणार असल्याचे सावजी यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले होते, मी येईन, मी पुन्हा येईन आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला, असेही सावजी यांनी नमूद केले. यानंतर ढोल-ताशांचा गजरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करताना देवेंद्र फडणवीस आगे बढोच्या घोषणा दिल्या.दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीतील फुटिरांमुळे झालेल्या सत्तेमुळे शिवसेना आणि कॉँग्रेसमध्ये रोष व्यक्त केला जात होता. त्यातून शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजप, कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना कार्यालयाबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर नाशिकरोड बिटको चौकात पेढे वाटून ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बाजीराव भागवत, सुनील आडके, संभाजी मोरूस्कर, शांताराम घंटे, पंडित आवारे, अंबादास पगारे, आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.अजित पवारांच्या विरोधात आंदोलन; पोलिसांमुळे रद्दराष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपबरोबर जाऊन सत्ता स्थापन करण्याच्या निर्णयामुळे राष्टÑवादीत चलबिचल सुरू झाली. अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ यांनी केली. मात्र त्यांंचे संभाव्य आंदोलन कळताच पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी तसेच शिरसाठ यांच्या कार्यालयात तळ ठोकला असून, त्यामुळे आंदोलन होऊ शकले नाही. नूतन महापौरांनीही धरला ठेकाशुक्रवारीच महापौरपदी विराजमान झालेल्या सतीश कुलकर्णी यांना दुसऱ्याच दिवशी या घडामोडींमुळे राज्यातील भाजप सरकार आणि नाशिकमधील महापौरपदी विराजमान होण्याचा एकत्रित जल्लोष करण्याची संधी लाभली. मग पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहानुसार महापौरांनीदेखील ढोल, ताशा आणि गुलालाच्या उधळणीत नृत्यावर ठेका धरून आनंद साजरा केला. उपमहापौर भिकूबाईदेखील आनंदोत्सवात सहभागी झाल्या होत्या.आधी जल्लोष, मग शांतताभाजपने सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याने जल्लोष साजरा केला खरा, मात्र दुपारी राष्टÑवादी आणि शिवसेनेच्या एकत्रित बैठकीनंतर राष्टÑवादीतील अजित पवार यांचे बंड मोडण्यास सुरुवात झाली बहुतांशी राष्टÑवादीचे आमदार पक्षाच्या बैठकीसाठी हजर राहिल्याने मात्र नंतर भाजपत शांतता होती. तरीही आता बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही पक्ष करेल, असा विश्वास पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. अनेक कार्यकर्ते कार्यालयात दूरचित्रवाणीवरील बातम्या बघण्यात व्यस्त होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNashikनाशिक