शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासाचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:17 IST

नदीकाठच्या गावठाणातील निळ्या आणि पूररेषेत यापूर्वी इमारतीच्या पुनर्विकासासाठी जलसंपदा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते. परंतु, आता पुनर्विकासासाठी अशा प्रमाणपत्राची गरज भासणार नसून विकासकाला बांधकामासाठी थेट महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करता येणार आहे.

नाशिक : नदीकाठच्या गावठाणातील निळ्या आणि पूररेषेत यापूर्वी इमारतीच्या पुनर्विकासासाठी जलसंपदा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले होते. परंतु, आता पुनर्विकासासाठी अशा प्रमाणपत्राची गरज भासणार नसून विकासकाला बांधकामासाठी थेट महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करता येणार आहे. नगररचनाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे यांनी महापालिकेने शहर विकास नियंत्रण नियमावलीतील काही मुद्द्यांबाबतचे मागवलेले स्पष्टीकरण दिले असून, त्यात या महत्त्वपूर्ण प्रश्नाचा समावेश आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावठाणातील पुनर्विकासाचा मार्ग सुकर झाल्याची माहिती नगररचनाच्या सूत्रांनी दिली आहे.राज्य शासनाने जानेवारी २०१७ मध्ये शहर विकास आराखड्याबरोबरच शहर विकास नियंत्रण नियमावलीही प्रसिद्ध केली होती. सदर नियमावलीत सुमारे १२ मुद्द्यांबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाला धारणा निश्चित होत नव्हती. त्यामुळे संबंधित प्रकरणे मंजूर करण्यात अडथळे येत होते. नगररचना सहसंचालक प्रतिभा भदाणे यांनी काही मुद्द्यांबाबतचे स्पष्टीकरण महापालिकेला पाठविले आहे. त्यात प्रामुख्याने निळ्या आणि लाल पूररेषेतील पुनर्विकासाचा महत्त्वाचा मुद्दा होता. यापूर्वी गावठाणातील निळ्या आणि लाल पूररेषेतील बांधकामांना जलसंपदा विभागाची एनओसी अर्थात ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक होते. त्याशिवाय महापालिकेला परवानगी देता येत नव्हती. मात्र, यापुढे अशा ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नसून विकासकाला थेट महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करता येणार आहे. त्याचबरोबर, १५ मीटरपेक्षा जास्त आणि २४ मीटरपेक्षा कमी उंचीच्या जुन्या इमारतींना यापूर्वी दोन स्टोअरकेस (जिने) बंधनकारक होते. मात्र, आता एकच जिना बांधता येणार असून, आगीच्या प्रसंगी आपत्कालीन स्थितीत लागणाºया जिन्याची आवश्यकता नसेल. एखाद्या विकासकाने चार मजली बांधकाम केले असेल आणि साइड मार्जिन सोडले नसेल तर त्यास परवानगी दिली जात नसे. मात्र, आता वर मजले बांधायचे असतील तर हार्डशिप प्रीमिअम भरून आयुक्तांच्या परवानगीने बांधकाम करणे शक्य होणार आहे. याशिवाय, जागेवरच बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी कंपाऊंडिंग चार्जेस भरावे लागतील. विकासकाला जागेची विभागणी करून रो हाऊसचेही बांधकाम प्रस्तावित करता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका