शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

परिचर पदोन्नतीचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:14 IST

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या परिचर (शिपाई) पदोन्नतीच्या फाईलवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने परिचरांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या १७ रोजी पदोन्नतीची निवड यादी जाहीर केली जाणार असून, परिचर कर्मचाºयांचे यादीकडे लक्ष लागून आहे.

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या परिचर (शिपाई) पदोन्नतीच्या फाईलवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने परिचरांच्या प दोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या १७ रोजी पदोन्नतीची निवड यादी जाहीर केली जाणार असून, परिचर कर्मचाºयांचे यादीकडे लक्ष लागून आहे.  जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनांवर कार्यरत असलेल्या परिचर कर्मचाºयांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. पदोन्नती मिळावी यासाठी परिचर कर्मचाºयांकडून सातत्याने विचारणा केली जात होती तर सदस्यांनीदेखील अनेकदा प्रशासनाला याप्रकरणी विचारणा केली होती. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शंभरकर आणि दीपककुमार मीणा यांच्या कार्यकाळात पदोन्नतीची फाईल पडून होती. त्यामुळे परिचरांच्या पदोन्नतीचा प्रश्न रेंगाळला होता. याप्रकरणी आमदार अनिल कदम यांनी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिचर पदोन्नतीच्या प्रश्नाबाबत विचारणा केली होती.  गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या परिचर पदोन्नतीचा प्रश्न अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मार्गी लावला असून, पदोन्नतीच्या फाईलवर स्वाक्षरी करून त्यांनी सदर फाईल प्रशासन विभागाकडे पाठविली असल्याचे समजते. परिचरांची सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हता लक्षात घेऊन तयार करण्यात येणारी यादी येत्या १७ रोजी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे परिचर कर्मचाºयांचे या यादीकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर आणि मुख्यालयातदेखील अनेक परिचर पदोन्नतीस पात्र असल्याने या कर्मचाºयांना आता कनिष्ठ लिपिकपदी बढती मिळणार आहे.पंधरा परिचर समाधानीजिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर असलेल्या परिचर कर्मचाºयांना एकीकडे पदोन्नतीची अपेक्षा असताना आणि यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत असताना ८६ पैकी सुमारे १५ परिचर असे आहेत की ते आहे त्याच ठिकाणी समाधानी आहेत. त्यांनी पदोन्नतीच्या स्पर्धेत नसल्याचे आणि आपण परिचर म्हणूनच काम करण्यास इच्छुक असल्याचे पत्र प्रशासनाला यापूर्वीच दिले आहे. त्यामुळे या पदोन्नतीच्या यादीत या पंधरा कर्मचाºयांचा समावेश नाही. दरम्यान, या पंधरापैकी काही कर्मचाºयांनी आपले अर्ज मागे घेतले असल्याचे समजते.पदस्थापना कशी करणार?पदोन्नती मिळाल्यानंतर पदस्थापना कशी करणार, असा प्रश्न आता परिचर कर्मचाºयांपुढे उभा आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी परिचर कर्मचाºयांकडून रिक्त पदानुसार परिचरांकडून प्राधान्यक्रम अर्ज भरून घेतले होते. कर्मचाºयांनी पसंतीक्रमांकानुसार तीन आॅप्शन भरून दिले आहेत. या पद्धतीनेच पदस्थापना करणार की आॅनलाइन पद्धतीने पदोन्नती केली जाईल याबाबत मात्र परिचर कर्मचाºयांमध्ये संभ्रमावस्था आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद