शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मालविक्रीतून आलेले जादाचे पैसे प्रामाणिकपणे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 00:39 IST

उमराणे : खारीपाडा (ता.देवळा) येथील श्री.रामेश्वर कृषी बाजारातील एका व्यापाऱ्यांकडून कांदा विक्रीतून आलेले जादाचे वीस हजार रुपये शेतकऱ्याने, प्रामाणिकपणे परत केल्याने कृषी बाजाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देदेवळा : श्री रामेश्वर कृषी बाजाराच्या वतीने शेतकऱ्याचा सन्मान

उमराणे : खारीपाडा (ता.देवळा) येथील श्री.रामेश्वर कृषी बाजारातील एका व्यापाऱ्यांकडून कांदा विक्रीतून आलेले जादाचे वीस हजार रुपये शेतकऱ्याने, प्रामाणिकपणे परत केल्याने कृषी बाजाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.कृषी बाजारात कांदा खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याने, बहुतांशी वेळा कांदा विक्रेते शेतकरी व कांदा खरेदीदार व्यापारी यांचेकडून नजरचुकीने कमी-अधिक पैशांची देवाण घेवाण होते. परिणामी, झालेल्या चुकीचा फटका सहन करावा लागतो, परंतु सध्याच्या युगात अजूनही प्रामाणिकपणा टिकून असल्याने वेळोवेळी बहुतांशी ठिकाणी जाणवते. याचाच प्रत्यय खारीपाडा येथील श्री.रामेश्वर कृषी बाजारात घडला.ताहराबाद येथील शेतकरी पांडुरंग दादाजी सावळे यांनी रामेश्वर कृषी बाजारात कांदा विक्रीस आणला होता. लिलाव होऊन सदर कांदा रेणुका आडत दुकानामार्फत खरेदी करण्यात आला असता, त्या मालाची एकूण रक्कम ३६,३७७ रुपये इतकी होती, परंतु संबंधित व्यापाऱ्याकडून नजरचुकीने या शेतकऱ्यास ५६,३७७ रुपये एवढी अदा केली गेली. सदर शेतकऱ्याने चुकवती न बघता, पैसे मोजून घरी गेला असता, मालविक्रीतून आलेल्या पैशांव्यतिरिक्त वीस हजार रुपये जास्त आल्याचे निदर्शनास आले, परंतु वाढीव पैशांचा मोह न बाळगता, हे पैसे दुसर्‍याच दिवशी कृषी बाजारात येऊन संबंधित व्यापाऱ्यास प्रामाणिकपणे परत केले. अशा प्रामाणिक शेतकऱ्याचा मार्केटचे मुख्य संचालक श्रीपाल ओस्तवाल व कांदा व्यापारी खंडू देवरे यांच्या हस्ते लिलावाच्या ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी कांदा व्यापारी संतोष बाफणा, योगेश पगार, सचिन देवरे, प्रवीण बाफणा, शैलेश देवरे, अमोल देवरे, नितीन काला व इतर व्यापारी उपस्थित होते. 

टॅग्स :market yardमार्केट यार्डFarmerशेतकरी