शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

ेत्र्यंबक शहराची हद्दवाढ अधिकृतपणे राजपत्रात जाहीर

By admin | Updated: May 7, 2014 21:22 IST

र्यंबक शहराची हद्दवाढ अखेर तीन वर्षांनंतर अधिकृतरीत्या मंजूर झाली असून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने राजपत्रात त्र्यंबक पालिकेची हद्दवाढ जाहीर करण्यात आली आहे.

त्र्यंबक शहराची हद्दवाढ अखेर तीन वर्षांनंतर अधिकृतरीत्या मंजूर झाली असून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने राजपत्रात त्र्यंबक पालिकेची हद्दवाढ जाहीर करण्यात आली आहे. तब्बल ३९ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हद्दवाढीला हिरवा कंदील मिळाला.ऑक्टोबर २०११ मध्ये प्राथमिक अधिसूचना जाहीर करून हद्दवाढीबाबत हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. विशेष म्हणजे आलेली हरकत वजा केलेल्या सूचनांची दखल घेऊन तीन वर्षांनी हद्दवाढीची घोषणा करण्यात आली. तथापि, राजपत्रात अधिसूचनेद्वारे जाहीर होईपर्यंत अधिकृतपणे हद्दवाढ झाली, असे म्हणता येणार नव्हते. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हद्दवाढ १४ फेब्रुवारी २०१४ रोजी जाहीर करण्यात आली आणि सदरची प्रत पालिकेला नुकतीच प्राप्त झाली.आता १.८९ चौ.कि.मी.वरून अधिक ११.५५ चौ. कि.अतिरिक्त क्षेत्र वाढून एकूण १२.४४ चौ. कि.मी. क्षेत्रवाढ शहराची झाली आहे. या हद्दवाढीत कुठल्याही गावांचा समावेश नसून केवळ शिवारातील सीमा घेऊन हद्दवाढ करण्यात आली आहे. यामध्ये नीलपर्वत बिल्वतीर्थ यासह पूर्वेकडील पेगलवाडी व अंजनेरीची शिव, पश्चिमेकडे सायगाव, तळेगाव दुमालाची शिव, उत्तरेकडे पिंपळद (त्र्यंबक), तळवाडे या गावांची शिव, तर दक्षिणेकडे मेटघर किल्ल्याची शिव व त्र्यंबक ग्रामीणचा समावेश आहे.सन २०१५-१६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काही विकासकामांना जागा नव्हत्या त्यासाठी उपयोग होणार आहे. त्र्यंबक शहराची वाढती लोकसंख्या, शहरातील जागांना आलेले भाव पाहता जागांचाही प्रश्न सुटणार आहे आणि पालिका हद्दीत ज्या गावांच्या शिवारातील जागा आल्या आहेत त्यांचाही एन.ए.चा प्रश्न मिटणार आहे.पालिकेतील विविध विकासकामांसाठी जागा अपूर्ण पडत होती. तोही प्रश्न आता सुटणार आहे. मात्र त्यासाठी तब्बल ३९ वर्षे पालिकेला वाट पाहावी लागली. याचे कारण म्हणजे मध्यंतरीच्या काळात अडगळीत पडलेला हद्दवाढीचा प्रस्ताव!सन १९७५ मध्ये प्रथम प्रस्ताव मांडला गेला त्यावेळचे सूचक होते स. बा. देवरे, तर अनुमोदक होते शांताराम गाजरे त्यानंतर ११ वर्षांनंतर हद्दवाढीचा दुसरा प्रस्ताव मांडला तो तत्कालीन नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांच्या कार्यकाळात! सूचक होते प्रतिभाताई गायकवाड व सुरेश पाचोरकर, तर अनुमोदक होते उषाताई श्िंागणे व सुरेश पाडेकर. त्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष कैलास घुले यांच्या काळात सन १९९१-९२ च्या दरम्यान प्रस्ताव मंजूर करून पाठपुरावा केला गेला.-----