शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट रोडच्या कामासाठी  ३० जूनपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:11 IST

त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने आता ३० जूनपर्यंत मुदत दिली असून, आता तरी हे काम सुरू होईल काय याविषयी शंकाच व्यक्त केली जात आहे.

नाशिक : त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने आता ३० जूनपर्यंत मुदत दिली असून, आता तरी हे काम सुरू होईल काय याविषयी शंकाच व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी सीबीएस चौकात काम करण्यासाठी याठिकाणची वाहतूक बंद करण्याची अधिसूचना पोलिसांनी जाहीर करून १५ दिवस झाले, मात्र याठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही.एक किलोमीटरच्या या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. मेहेर ते सीबीएस हेच काम इतके प्रचंड रखडले की, या मार्गावरून जाणे-येणे लोकांना त्रासदायक होऊ लागले. असाच प्रकार सीबीएस ते त्र्यंबक नाका सिग्नलदरम्यान घडला.जानेवारी २०१८ मध्ये या ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सहा महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण होणे बंधनकारक होते. परंतु या कालावधीत ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र या मुदतीतही हे काम पूर्ण झाले नाही. दरम्यान, राधाकृष्ण गमे यांनी या रस्त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी ठेकेदारास ३१ मार्चपर्यंत अल्टिमेटम दिला होता. परंतु आता तोदेखील संपुष्टात आल्यानंतर आता ३० जून ही नवीन डेडलाइन दिली आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास आता एकूण निविदा रकमेच्या अर्धा टक्का दंड करण्याचा प्रस्ताव आहे.रस्त्याचे त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ असे काम करण्यात येत असून, त्यासाठी सर्वाधिक रहदारीची सीबीएस चौकातील वाहतूक बंद करण्याची सूचना २५ एप्रिल रोजी काढण्यात आली. मात्र पंधरा दिवस झाले तरी या चौकात कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही आणि वाहतूकदेखील सुरू आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका