लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली असून, यापूर्वी २१ आॅगस्टपर्यंत असलेली ‘आयटीआय’ प्रवेशाच्या अर्जाची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.तांत्रिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशासाठी अर्ज नोंदविता न आल्याने मुदतवाढ देण्यात आली असून, ५ सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. जे विद्यार्थी अर्जासोबत प्रवेश अर्जाचे शुल्क भरतील त्यांचेच अर्ज पुढील प्रवेशप्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या या प्रवेशप्रक्रियेचे दुसऱ्यांदा वेळापत्रक बदलण्यात आले आहे. दहावी च्या निकालानंतर गेल्या आठवड्यात गुणपत्रिकेचे वाटप सुरु झाले. अनेक विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्याने त्यांना अर्ज नोंदणीत अडचणी आल्या. काही विद्यार्थ्यांना तांत्रिक समस्येमुळे अर्ज नोंदवता आले नाहीत. त्यामुळे २१ आॅगस्टनंतर पुन्हा दहा दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जाणार नाही, याबाबत नियोजन सुरु असून यानंतर शक्यतो मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पहिल्या वेळापत्रकानुसार २० आॅगस्ट रोजी प्रवेशाची पहिली फेरी होणार होती. मात्र, दोन वेळेस प्रवेश प्रक्रियेत बदल झाल्याने अठरा दिवसांनी प्रवेश प्रक्रिया पुढे सरकली आहे. त्यानंतर ८ सप्टेंबरला पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसाया निहाय निवड यादी संकेस्थळावर प्रसिद्ध करून संबंधित उमेदवारांना एसएमएस द्वारे कळविण्यात येणार असून ९ ते १४ सप्टेंबर दरम्यान पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित केले जाणार आहे. बदल करण्याची संधीआयटीआय प्रवेशाच्या सुधारित वेळापत्रकानुसार दि.३ सप्टेंबर प्राथमिक गुणवत्ता यादी (सकाळी ११ वाजता) प्रसिद्ध होणार असून, ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना त्यावर हरकती नोंदविण्याची तसेच माहितीत बदल करण्याची संधी मिळणार आहे. तर ५ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी (सायंकाळी ५ वाजता) घोषित होणार आहे.
आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:19 IST
नाशिक : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली असून, यापूर्वी २१ आॅगस्टपर्यंत असलेली ‘आयटीआय’ प्रवेशाच्या अर्जाची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ
ठळक मुद्दे५ सप्टेंबरला अंतिम गुणवत्ता यादी : ९ ते १४ सप्टेंबरदरम्यान प्रवेश