शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ द्यावी

By admin | Updated: December 27, 2016 23:24 IST

केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे : महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने घेतली भेट

लोहोणेर : कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक व निर्यातदारांच्या शिष्टमंडळाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत बोलताना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक व निर्यातदारांची समस्या विशद करताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, यावर्षी राज्यातील कांदा उत्पादन हे दोन लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त होणे अपेक्षित आहे. हे उत्पन्न चांगल्या हंगामाच्या सरासरी १.७५ लक्ष मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान या शेजारील तसेच इतर राज्यांतही चांगल्या हवामानामुळे कांद्याचे जास्त उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादन किफायतशीर होण्यासाठी व किंमत स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यात होणे अत्यंत आवश्यक आहे. इतर कांदा उत्पादक व निर्यातदार देशांमध्येही यावर्षी कांद्याचे जास्त उत्पन्न झाले असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे भाव अत्यंत कमी झाले आहेत. या योजनेस ३१ डिसेंबर २०१६ नंतर मुदतवाढ न दिल्यास महाराष्ट्रातील कांदा उत्पादक व निर्यातदार शेतकऱ्यांची कांदा निर्यातीची क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे व त्यांना इतर देशातील बाजार उपलब्ध होणे व निर्यात करणे यावर बंधने येणार आहेत. त्यामुळे निर्यात कमी होऊन राज्यात व देशात कांदा मागणीपेक्षा जास्त उपलब्ध होऊन कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता व परिणामी कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)