शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजनअभावी सिव्हिलमधील  १५० बेड्स वाढविणे लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:52 IST

जिल्हा रुग्णालयात निर्माण होणारा आणि दररोज मिळणारा ऑक्सिजन विद्यमान नागरिकांनाच कसाबसा पुरेसा पडत आहे. त्यामुळेच सिव्हीलमध्ये बेड वाढविण्यासाठीची जागा, ऑक्सिजन बेडची यंत्रणा सारे काही उपलब्ध असूनदेखील तिथे १०० ते १५० बेड वाढवण्याच्या प्रयासांना सतत लांबणीवर टाकावे लागत आहे. त्यामुळे जागा आणि बेडची उपलब्धता होऊ शकत असूनही ऑक्सिजन बेड वाढविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.  

ठळक मुद्देवाट पहावी लागणार : नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांना नो एन्ट्री

नाशिक : जिल्हा रुग्णालयात निर्माण होणारा आणि दररोज मिळणारा ऑक्सिजन विद्यमान नागरिकांनाच कसाबसा पुरेसा पडत आहे. त्यामुळेच सिव्हीलमध्ये बेड वाढविण्यासाठीची जागा, ऑक्सिजन बेडची यंत्रणा सारे काही उपलब्ध असूनदेखील तिथे १०० ते १५० बेड वाढवण्याच्या प्रयासांना सतत लांबणीवर टाकावे लागत आहे. त्यामुळे जागा आणि बेडची उपलब्धता होऊ शकत असूनही ऑक्सिजन बेड वाढविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.  जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांना मिळून नाशिक जिल्ह्यात किमान १२५ मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज असते. मात्र, प्रत्यक्षात नाशिकला ८५ मेट्रीक टन ऑक्सिजनच उपलब्ध होत आहे. अशा परिस्थितीत कुणालाही नवीन ऑक्सिजन बेड वाढवायचे असले तरी ऑक्सिजनची पूर्तता मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयानेदेखील १५० हून अधिक ऑक्सिजन बेड वाढवण्यासाठी जागेसह सर्व बाबींची पूर्तता केली आहे. मात्र, तेवढ्या रुग्णांना लागू शकणारा ऑक्सिजन आणि जम्बो सिलिंडर्सची पूर्तता होऊ शकत नाही.ऑक्सिजनची तूट दूर होईनाजिल्ह्यात गत महिन्याच्या प्रारंभापासूनच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला. दरम्यान, गत महिन्यात २१ एप्रिलला झाकीर हुसेनमध्ये  ऑक्सिजन गळती झाल्यापासून ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. काही रुग्णालयांनी तर ऑक्सिजनअभावी त्यांच्याकडील रुग्ण अन्यत्र घेऊन जाण्यास कुटुंबीयांना सांगितल्याच्या अनेक घटना घडल्या. तर काही रुग्णालयांनी एप्रिलच्या अखेरीस नवीन रुग्ण घेणेच थांबवले होते. मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडूनदेखील ऑक्सिजनची ही तूट कमी होऊ शकलेली नाही.  

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल