शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एक्सप्रेशन-२०१७ : ...जेव्हा नाशिकचे डॉक्टर दाखवितात रॅम्पवर आपला जलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:14 IST

‘ताणतणावमुक्त डॉक्टरर्स’ संकल्पनेवर आधारित इंडियन मेडिक ल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘एक्सप्रेशन-२०१७’ या सांस्कृतिक महोत्सवाचे.

ठळक मुद्देआयएमए क्वीन स्पर्धेत २४ व हायनेस गटात ८ अशा एकूण ३२ डॉक्टरांनी सहभाग घेतला ‘एक्सप्रेशन-२०१७’ या सांस्कृतिक महोत्सवाचे

नाशिक : वैद्यकीय सेवा देणा-या डॉक्टरांनी मॉडेलप्रमाणे प्रथमच रॅम्पवर ‘एन्ट्री’ करत कॅटवॉक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी डॉ. मीनल रणदिवे यांनी ‘आयएमए क्वीन’ होण्याचा बहुमान पटकाविला तर डॉ. शर्मिला कुलकर्णी यांनी हायनेस स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.निमित्त होते, ‘ताणतणावमुक्त डॉक्टरर्स’ संकल्पनेवर आधारित इंडियन मेडिक ल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘एक्सप्रेशन-२०१७’ या सांस्कृतिक महोत्सवाचे. विश्वास लॉन्समध्ये रंगलेल्या या रंगारंग सोहळ्यात डॉक्टरांमधील कलागुणांचे दर्शन प्रेक्षकांना घडले. व्यावसायिक मॉडेललाही लाजवेल, अशा अदा डॉक्टरांनी सादर करत रॅम्पवर कॅटवॉक करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वैद्यकीय सेवेचे कार्य बजावताना सातत्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये डॉक्टरांना कौशल्य पणाला लावावे लागते, या कामातून येणारा तणाव दूर करण्यासाठी आयएमएच्या महिला मंडळाच्या वतीने या महोत्सवाची संकल्पना मांडली. या सोहळ्यात ‘आयएमए क्वीन’ व ‘हायनेस’ या दोन स्पर्धा घेण्यात आल्या. प्रारंभी महिला डॉक्टरांनी रॅम्पवर कलागुणांचे सादरीकरण करत ‘फॅशन-शो’चा जलवा दाखविला. यावेळी डॉक्टरांनी नृत्य व गायनाचा कार्यक्रम सादर केला. त्यांना साथसंगत एम.एच१५ रॉक बॅण्डच्या वादकांनी केली. यावेळी झालेल्या फायर-शो ने कार्यक्रमाची रंगत वाढविली. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, महापालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्ण, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार उपस्थित होते. परीक्षक म्हणून फॅशन स्टायलिश तृप्ती बाफना, डॉ. मनोज चोपडा यांनी काम पाहिले. आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी प्रास्ताविक केले तर सचिव डॉ. हेमंत सोनणीस, उपसचिव डॉ. किरण शिंदे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन रोहन मेहता यांनी केले.३२ डॉक्टरांचा स्पर्धेत सहभागआयएमए क्वीन स्पर्धेत २४ व हायनेस गटात ८ अशा एकूण ३२ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. यावेळी रणदिवे यांना आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते मुकुट देऊन गौरव करण्यात आला. तसेच कुलकर्णी यांना मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी गौरविले. क्वीन स्पर्धेत डॉ. वैशाली अग्रवाल यांनी द्वितीय तर डॉ. वृषाली राजाध्यक्ष यांनी तृतीय क्र मांक मिळविला आणि हायनेस गटात डॉ. विजयलक्ष्मी गणोरकर यांनी द्वितीय तर डॉ. सुनीता देशमुख यांनी तृतीय क्रमांक राखला.

 

टॅग्स :doctorडॉक्टरNashikनाशिकfashionफॅशनcultureसांस्कृतिक