शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

निर्यातक्षम द्राक्षे तोडून टाकली बागेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 22:07 IST

निफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देकवडीमोल दर । कोरोनाच्या संकटाने उत्पादक धास्तावले; पंचनामे करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड/खेडलेझुंगे : कोरोनाच्या संकटामुळे कवडीमोल दरामुळे धास्तावलेल्या निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकºयाने सुमारे २५० क्ंिवटल द्राक्ष बागेतच तोडून टाकत संताप व्यक्त केला.कोरोनामुळे निर्यातबंदी असल्याने द्राक्षबागांना कमी भाव मिळत आहे. शासनाने शेतकऱ्यांकडून हमीभावाने द्राक्षांची खरेदी करणे गरजेचे वाटत आहे. कारण बांधावर व्यापारी शेतकºयांकडून कमी दराने द्राक्ष खरेदी करत आहेत. शेतकºयांनी स्वत:च्या कुटुंबाचा घास हिसकावून द्राक्षबागांसाठी खर्च करून द्राक्षबागा वाचविलेल्या आहेत. वाचविलेल्या बागांमधून अत्यल्प उत्पादन मिळणार आहे. परतीच्या पावसातून वाचविलेल्या बागांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला आहे. एक एकर बागांसाठी तीन लाखांच्यावर खर्च झालेला आहे.निफाड तालुक्यातील देवगाव-महादेवनगर येथील शेतकरी प्रवीण उफाडे यांनी ३५ गुंठेमधील निर्यातक्षम असलेले सुमारे २५० क्विंटल द्राक्षांना योग्य भाव न मिळाल्याने कटिंग करून द्राक्षबागेच्या गल्ल्यांमध्ये टाकून दिलेले आहेत. निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे तीन लाखांपर्यंतचा खर्च झालेला आहे. स्थानिक व्यापारी आणि निर्यात करणाºया व्यापाºयांकडून अवघा २-३ रुपये किलोने मागणी झाल्याने उफाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसामध्ये याआधी एक एकर बागाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे या उर्वरित ३५ गुंठेच्या बागेतून किमान खर्च तरी वसूल होईल, अशी आशा बाळगून उफाडे यांनी कुटुंबीयांसोबत मेहनत घेत निर्यातक्षम द्राक्ष तयार केली होती. शेतकºयांचा अपेक्षाभंगद्राक्षबागेकडून त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु कोरोनामुळे ती धुळीस मिळाळी आहे. यावर्षी या बागांवर झालेला खर्चही न मिळाल्याने कुटुंब कर्जाच्या खायीत गेलेले आहे. व्यापाºयांकडून कवडीमोलाने निर्याक्षम द्राक्षांची मागणी झाल्याने हतबल झालेल्या उफाडे यांनी सदरचा माल हा तोडून जमिनीवरचअंथरूण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना या द्राक्षांपासून मनुका तयार करण्याचा सल्ला अनेकांनी दिला आहे.निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे तीन लाखापर्यंतचा खर्च करण्यात आला आहे. त्यातच द्राक्षांची पूर्णत: साखर रिटर्न झालेली आहे. त्यामुळे हे द्राक्ष उन्हाने वाळवूूनही विक्र ी लायक असा मनुका तयार होणार नाही. त्यामुळे ग्राहकांकडून अशा मनुका खरेदी होणे अत्यंत जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे द्राक्ष तोडून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे उफाडे यांनी सांगितले. शेतीमाल विक्रीसाठी शासन स्तरावर योग्य धोरण ठरविणे गरजेचे आहे. माझा पहिला एक एकर बाग परतीच्या पावसात सापडल्याने पूर्णत: नष्ट झालेला आहे. त्यामुळे आम्ही उर्वरित नवीन पाच वर्षाचा सुमारे ३५ गुंठे जमिनीवरील बागेसाठी जीवतोड मेहनत घेतली. कुटुंबीयांच्या तोंडाला घास कमी करून या बागेसाठी औषधे, मशागतीसाठी खर्च केला. परंतु दोन ते तीन रु पये किलोने द्राक्षाची मागणी झाल्याने आमची भ्रमनिराशा झालेली आहे.-प्रवीण उफाडे, महादेवनगर

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटFarmerशेतकरी