शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातबंदी उठली अन‌् परदेशातील दर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 00:24 IST

नाशिक : भारताने कांद्याची निर्यात खुली केली अन् परदेशातील कांद्याचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे निर्यातबंदी उठल्याने खूप हुरळून जाण्यासारखी स्थिती नाही. कांद्याच्या दरात खूप मोठा फरक पडणार नाही. फार फार तर ३०० ते ४०० रुपयांनी दर वाढतील, असा तज्ज्ञांना अंदाज आहे.

ठळक मुद्देस्पर्धा करावी लागणार : कांदा दरावर फारसा फरक पडणार नसल्याचा अंदाज

नाशिक : भारताने कांद्याची निर्यात खुली केली अन् परदेशातील कांद्याचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे निर्यातबंदी उठल्याने खूप हुरळून जाण्यासारखी स्थिती नाही. कांद्याच्या दरात खूप मोठा फरक पडणार नाही. फार फार तर ३०० ते ४०० रुपयांनी दर वाढतील, असा तज्ज्ञांना अंदाज आहे.

शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी आणल्यास, त्यांना वाढीव किमतीचा फायदा होऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविल्याने स्थानिक बाजारांमध्ये मंगळवारपासून कांदाभावात थोडी-फार सुधारणा होऊन भाव वाढले आहेत. मात्र, ते आणखी वाढतील की नाही, याची खात्री देता येत नाही. कारण भारताची निर्यात खुली झाल्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराणमधील कांद्याचे दर कमी झाले आहेत, शिवाय तेथे कांदा पुरेसा उपलब्ध आहे.

आपल्याकडील कांद्याला त्या जागतिक बाजारपेठेत दराबाबत स्पर्धा करावी लागणार असल्याने, व्यापारी चढ्या दराने कांदा खरेदी करण्याचा धाका पत्करणार नाहीत. यामुळे कांदा दर २,५०० ते ३,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्थिर राहू शकतात, असा व्यापारी वर्गाचा अंदाज आहे.आयातीचे धोरण कायमनिर्यातबंदी उठवितानाच केंद्र शासनाने कांदा आयातीला मुदत वाढ दिलेली आहे. देशात लागवड झालेल्या लाल कांद्याच्या उत्पादनाचा अंदाज नसल्याने जर किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले, तर निर्यातबंदी होऊ शकते, असा यापूर्वीचा अनुभव पाहता, शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊनच कांदा विक्रीचा निर्णय घ्यायला हवा, असा सल्लाही दिला जात आहे.निर्यातबंदी उठल्यामुळे इतर देशांमधील कांदाभाव पडले आहेत. यामुळे आपल्याकडील कांदा दरात खूप मोठा फरक पडेल, असे वाटत नाही. खूप झाले, तर २०० ते ३०० रुपयांनी कांदा भाव सुधारतील. आपल्याकडील कांद्याला परदेशात स्पर्धा करावी लागणार आहे. निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय चांगला आहे. त्यामुळे देशात कोसळत असलेले कांदाभाव स्थिर राहाण्यास मदत झाली आहे.- नितीन जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा