शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचा प्रकार उघड

By admin | Updated: May 31, 2014 00:18 IST

व्यवसाय प्रशिक्षणाच्या नावाखाली गंडा

व्यवसाय प्रशिक्षणाच्या नावाखाली गंडासिडको : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे जिल्हानिहाय नवीन प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजासाठी जिल्हा समन्वयक अधिकारी व इतर पदे भरावयाची असल्याबाबत महाराष्ट्रभर वृत्तपत्रात जाहिराती देऊन बेरोजगार युवकांची फसवणूक करण्याचा प्रकार नुकताच बेरोजगार युवकांनीच उघडकीस आणला.पाथर्डीफाटा येथील प्रशांतनगर परिसरात साईश्रद्धा रो-हाऊसमध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय उघडण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर वृत्तपत्रात जाहिराती देऊन काही पदे भरावयाची असल्याचे नमूद करण्यात आले होते. यात जिल्हा समन्वयक अधिकारी, प्रकल्प अधिकारी कार्यालय, निरीक्षक (नाशिक कार्यालयासाठी) सह. कार्यालय, नाशिक या पदांसाठी प्रत्येक जिल्हानिहाय कामकाज करण्यासाठी पदे भरावयाची असल्याचे जाहिरातीत प्रसिद्ध केले. तसेच ३० मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील विभागीय मुख्य कार्यालयात इच्छुक उमेदवारांना भेटण्यासाठी येण्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आज महाराष्ट्रातील नाशिकसह जालना, अमळनेर, परभणी, औरंगाबाद, बीड, सोलापूर, जळगाव, भुसावळ, यावल आदिंसह महाराष्ट्रातील सुमारे दोनशेहून अधिक बेरोजगार मुलाखतीसाठी दाखल झाले होते. परंतु मुलाखतीच्या वेळी संबंधितांनी सुरुवातीस प्रत्येकाने शंभर रुपये भरण्यास सांगितले. यानुसार बहुतांशी बेरोजगारांनी शंभर रुपये भरले. तसेच यानंतर संबंधितांनी बेरोजगार युवकांना जाहिरातीत दिलेल्या पदासाठी एक ते दीड लाख रुपये प्रत्येकी खर्च असल्याचे सांगितले. परंतु जालना येथील विधी शाखेची पदवी असलेल्या किशोर गोफणे या बेरोजगार युवकास आपली काहीतरी फसवणूक होत असल्याची शंका आली. यानंतर सर्व बेरोजगार युवक एकत्र आले व त्यांनी या सार्‍या गोष्टीचा भंडाफोड केला.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता सदरचे कार्यालय हे शासन मान्यताप्राप्त नसून कार्यालय हे शासनाचे असल्याचे भासवून बेरोजगारांची फसवणूक करण्याचा प्रकार बेरोजगार युवकांनीच उघडकीस आणला. यावेळी सतीश दुसाने, महेश तायडे, रोहिदास गांगवे, मिलिंद धडे, वैभव दुसाने, राहुल मोरे, एकनाथ बडोगे आदिंसह दीडशे ते दोनशे युवक उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करीत बेरोजगार युवकांनी दिलेले प्रत्येकी शंभर रुपये हे संस्थाचालकाने परत दिल्याचे पोलिसांनी सांगितले.