शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचाऱ्यांअभावी व्हेंटिलेटर्स पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:40 IST

रिॲलिटी चेक नाशिक : अतिगंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर्सची गरज लक्षात घेता मागील वर्षी पीएम केअर फंडातून नाशिक जिल्ह्याला एकूण २६०, ...

ठळक मुद्देसहा नादुरुस्त : पीएम केअर फंडातून जिल्ह्याला मिळाले २८५ व्हेंटिलेटर्स

रिॲलिटी चेकनाशिक : अतिगंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर्सची गरज लक्षात घेता मागील वर्षी पीएम केअर फंडातून नाशिक जिल्ह्याला एकूण २६०, तर चालू वर्षी २५ व्हेंटिलेटर्स मिळालेले आहेत. यामधील ६० व्हेंटिलेटर्स जिल्हा शासकीय रुग्णालयात असून, उर्वरित तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांना देण्यात आलेले आहेत. सद्य:स्थितीत उपलब्ध माहितीनुसार त्यातील ६ व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याने पडून आहेत. व्हेंटिलेटर्स असले तरी त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तसेच एमडी डॉक्टरांची वानवा आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर्स असूनही त्याचा वापर करण्यास अडचणी उत्पन्न होतात. तालुक्यांसाठी देण्यात आलेले काही व्हेंटिलेटर्स जिल्हा शासकीय रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आले.मालेगावी ५८ व्हेंटिलेटर्समालेगाव : गेल्यावर्षी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावी आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. ही हतबलता लक्षात घेऊन शासनाने मालेगाव शहराकडे विशेष लक्ष पुरवत गेल्या वर्षभरापासून ५८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत. या ५८ व्हेंटिलेटर्सपैकी २७ व्हेंटिलेटर्स पीएम केअर फंडातून उपलब्ध झाले आहेत. सद्य:स्थितीत २२ व्हेंटिलेटर्स महापालिकेला तर २७ व्हेंटिलेटर्स सामान्य रुग्णालयात उपलब्ध आहेत. तर काही व्हेंटिलेटर्स खासगी व नांदगावच्या शासकीय रुग्णालयाला देण्यात आले आहेत. सामान्य रुग्णालयाला २२ व्हेंटिलेटर्सची आवश्यकता आहे. परिणामी उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्समुळे रुग्णांना जीवदान मिळत आहे. ५८ पैकी २ व्हेंटिलेटर्समध्ये बिघाड झालेला आहे. त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी हे व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत. सध्या तरी ऑक्सिजनबरोबरच व्हेंटिलेटर्सचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे रुग्णालय प्रशासनावरील ताण कमी झाला आहे.चांदवडला चारही सुस्थितीतचांदवड : येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये खासदार डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून पीएम केअर फंडातून चार व्हेंटिलेटर्स मिळाले. त्या चारही मशीन चांगल्या अवस्थेत आहेत. अजून एक ते दोनची आवश्यकता असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. दरम्यान, चांदवड तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे व्हेंटिलेटर नाही व तेथे कोरोना रुग्ण दाखल होत नसल्याने तेथे व्हेंटिलेटरची आवश्यक नसल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.कळवण : ११ पैकी दोन नादुरुस्तकळवण : येथील उपजिल्हा रुग्णालयाला खासदार भारती पवार यांनी पीएम केअर फंडातून दहा व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले होते. त्यापैकी चार व्हेंटिलेटर्स नाशिक जिल्हा रुग्णालयात दिले असून, उर्वरित अकरा व्हेंटिलेटर्सपैकी चार मानूर कोविड सेंटरमध्ये, तर पाच कळवण उपजिल्हा रुग्णालयात कार्यान्वित आहेत. त्यातील दोन व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याने बंद आहेत. पीएम केयर फंडातून उपजिल्हा रुग्णालयास हे पंधरा व्हेंटिलेटर्स देण्यात आले होते. कळवण तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन व्हेंटिलेटर्सची गरज असल्याने चार व्हेंटिलेटर्स मानूर येथील कोविड सेंटरला देण्यात आले आहेत. पाच व्हेंटिलेटर्स उपजिल्हा रुग्णालयात असून, उर्वरित दोन व्हेंटिलेटर्स बंद असल्याने कार्यान्वित नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदसिंग परदेशी यांनी दिली.येवला तालुक्यात १० व्हेंटिलेटर्सयेवला : तालुक्यात पीएम केअर फंडातून गेल्यावर्षीच येवला व नगरसूल ग्रामीण रुग्णालयांसाठी प्रत्येकी ५ असे एकूण १० व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले आहेत. नगरसूल रुग्णालयाने ५ पैकी ३ व्हेंटिलेटर्स येवला रुग्णालयाला दिलेले असल्याने सद्य:स्थितीत वर्गोन्नत झालेल्या उपजिल्हा रुग्णालयात ८ व्हेंटिलेटर्स सुरू आहेत, तर नगरसूल ग्रामीण रुग्णालयात २ व्हेंटिलेटर्स सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले असल्याने गंभीर रुग्णांसाठी त्याचा वापर होतो आहे.-------------------------लासलगावी २ व्हेंटिलेटर्स बंदलासलगाव : निफाड तालुक्यातील लासलगाव येथील कोविड सेंटरमध्ये सात व्हेंटिलेटर्स मंजूर झाले असून, ते कार्यरत आहेत. रुग्णांची प्रकृती बघून ते कार्यान्वित केले जातात. परंतु याकरिता पुरेशीऑक्सिजनची उपलब्धता नसल्याने फारच तातडीची परिस्थिती निर्माण झाली तरच वापरले जातात, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण अहिरे यांनी दिली. सातपैकी दोन व्हेंटिलेटर्स किरकोळ कारणाने वापरता येत नाही. त्याची तांत्रिक दुरुस्ती होताच सातही व्हेंटिलेटर्स रुग्णांच्या सेवेत कार्यरत होतील.त्र्यंबकेश्वरला तीन व्हेंटिलेटर्सत्र्यंबकेश्वर : मागील वर्षी खासदार हेमंत गोडसे यांनी पीएम केअर फंडातून उपजिल्हा रुग्णालयाला तीन व्हेंटिलेटर्स दिले होते. ते जिल्हा रुग्णालयाकडून पाठवण्यात आले. तथापि, यावर्षी पीएम केअर फंडातून कोणतीही साधने मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे व्हेंटिलेटर कोणाला लावायचे हे फक्त फिजिशियन डॉक्टरच ठरवतात. परंतु त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन तज्ज्ञच उपलब्ध नाही. व्हेंटिलेटरचा उपयोग सध्या फक्त अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांनाच ऑक्सिजन लावण्यासाठी केला जात आहे.वणीचे नाशिकला पळविलेदिंडोरी : तालुक्यातील वणी येथील ग्रामीण रुग्णालयाला मागील वर्षी एक व्हेंटिलेटर पीएम केअर फंडातून मंजूर करण्यात आले होते. परंतु या ठिकाणी व्हेंटिलेटर चालवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने सदर व्हेंटिलेटर हे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. सद्य:स्थितीत या ठिकाणी एकही व्हेंटिलेटर नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला नाशिकला उपचारासाठी न्यावे लागते.मालेगावी केंद्रनिहाय व्हेंटिलेटर्सची संख्यासामान्य रुग्णालय - २३सहारा रुग्णालय - १८मसगा कोरोना सेंटर - ०४फारान हॉस्पिटल - ०४जीवन हॉस्पिटल - ०२जिल्हा रुग्णालय - ०२नांदगाव कोरोना सेंटर - ०१महिला रुग्णालय - ०३दाभाडी कोरोना सेंटर - ०१धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजला ५० व्हेंटिलेटर्स देण्यात आले होते, तर मालेगाव येथील रुग्णालयांना २७ व्हेंटिलेटर्स देण्यात आलेले आहेत. उपजिल्हा रुग्णालय अथवा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी प्रशिक्षित स्टाफ आणि एमडी फिजिशिअन डॉक्टर असेल तरच तेथे व्हेंटिलेटर्सचा उपयोग केला जातो. तालुकास्तरावर तसा स्टाफ उपलब्ध नाही. ही मोठी अडचण आहे. सद्य:स्थितीत ऑक्सिजन बेड उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी मालेगावी ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी मी खासदार निधी उपलब्ध करून दिलेला आहे.- डॉ. सुभाष भामरे, खासदार, धुळे मतदारसंघमागील वर्षी आणि यंदाही पीएम केअर फंडातून जिल्ह्याला व्हेंटिलेटर्स देण्यात आलेले आहेत. त्यातील काही तालुक्यांना वाटलेले आहेत; परंतु अनेक ठिकाणी ते ऑपरेट करणारा कर्मचारीवर्ग नाही. काही तालुक्यांचे व्हेंटिलेटर्स जिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले आहेत. ते ग्रामीण भागाची गरज लक्षात घेऊन पुन्हा तालुक्यातील रुग्णालयांना मिळाले पाहिजेत. साधनसामग्री आपल्या हाती असूनही त्याचा वापर होत नाही, याची खंत वाटते.- डॉ. भारती पवार, खासदार, दिंडोरी मतदारसंघफोटोची ओळ 08 एम.एम.जी.7-चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेले व्हेंटिलेटर.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या