शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

सटाण्यातून शहरात येत महागड्या दुचाकींवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 15:51 IST

नाशिक : लॉकडाऊन शिथिल होताच शहर व परिसरात नागरिकांच्या घरांसमोरून दुचाकी चोरी जाऊ लागल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. यामुळे ...

ठळक मुद्देदुचाकी चोरांकडून पाच दुचाकी हस्तगतअंबड, ओझरमधील गुन्हे उघड

नाशिक : लॉकडाऊन शिथिल होताच शहर व परिसरात नागरिकांच्या घरांसमोरून दुचाकी चोरी जाऊ लागल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. यामुळे शहर गुन्हे शाखाही सतर्क झाली. युनीट-१चे पथक महामार्गावर गस्तीवर असताना आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दोघे युवक संशयास्पदरित्या पल्सरसह आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. ते दोघे अट्टल दुचाकीचोर असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून चोरीच्या पाच लाखांच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.याबाबत अधिक माहिती अशी, दुचाकी चोरांच्या शोधात गुन्हे शाखा युनीट-१चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ हे पथकासोबत गस्तीवर होते. आडगाव पोलीस ठाणे हद्दीत उड्डाणपुलालगत एका ढाब्यासमोर संशयित संदीप नामदेव पवार (१९,रा. नवेगाव, ता.सटाणा), अंकुश अनिल सावंत (२४,रा.निंबोळा, ता.सटाणा), हे दोघे संशयास्पदरित्या हालचाली करत व अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आढळले. वाघ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले आणि पल्सर दुचाकींचे कागदपत्रे मागीतली यावेळी त्यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे या दोघांना पथकाने दुचाकींसह ताब्यात घेत थेट गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेले. तेथे त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील पल्सरवर (एम.एच.४१ बीए ०६३१) जाऊन पवननगर येथील एका घरासमोर उभी असलेली दुसरी पल्सर (एम.एच१५ जीजे ४५६८) संगनमताने दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याविरूध्द दुचाकीचोरीचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला व त्यांची कोठडी मिळविल्यानंतर गुन्ह्यात वापरलेल्या पल्सरसह अन्य तीन पल्सर व एक एफझेड अशा चार दुचाकी पुन्हा हस्तगत करण्यात आल्या. यामध्ये या सर्व दुचाकींपैकी केवळ एफझेड दुचाकी ओझर पोलीस ठाणे हद्दीतून तर उर्वरित सर्व अंबड पोलीस ठाणे हद्दीतून चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. पोलिसांनी एकूण ४ लाख ८५ हजार रूपये किंमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या चोरट्यांकडून दुचाकीचोरीचे अन्य गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीArrestअटक