नाशिक : भटक्या कुत्र्यांचा त्रास जवळपास सर्वच शहरात सारखा आहे. मात्र, नाशिक महापालिकेने गेल्या पाच वर्षांत तब्बल ५० हजारांहून अधिक श्वानांचे निर्बीजीकरण केले असून, त्यामुळे तक्रारींचा ओघ कमी झाला आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम दहा वर्षांपासून सुरू आहे. खासगी ठेकेदारामार्फत हे काम केले जाते. शहरातील भटके श्वान पकडून विल्होळी येथील जुन्या जकात नाक्याच्या ठिकाणी निर्बीजीकरण करण्यात येते. भटके श्वान शहराच्या विविध भागांतून पडकल्यानंतर निर्बीजीकरणाची प्रक्रिया करून, त्यानंतर तीन दिवस श्वानांना तेथेच ठेवले जाते आणि नंतर ज्या ठिकाणहून पकडले तेथे सोडून दिले जाते. दरवर्षी सहा ते सात हजार श्वानांवर शस्त्रक्रिया केली जाते. एका श्वानामागे सरासरी सातशे रुपये इतका दर ठेकेदाराला देण्यात आला आहे. त्यामुळे पाच वर्षांत आत्तापर्यंत ३ केाटी २७ लाख रुपयांचा खर्च हाेतो. निर्बीजीकरणानंतर श्वानांची संख्या किती कमी झाली, हा वादाचा विषय असला, तरी किमान आक्रमकता कमी झाली असून, डॉग बाइटचे प्रमाण कमी झाले आहे.
इन्फो..
हजारो कुत्र्यांसाठी पंधरा कर्मचारी
शहरातील श्वानांची निश्चित नाही. कारण श्वानांची शास्त्रोक्त गणना कुठेही झालेली नाही. त्यातच त्यांचे पुनरुत्पादन वेगाने होत असल्याने ते अशक्य आहे, तरीही महापालिकेकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने ठेकेदाराला श्वान पकडून निर्बीजीकरणाची कामे करावी लागतात. दोन डॉग व्हॅनसाठी आठ ते दहा कर्मचारी असून, नंतर निर्बीजीकरणाच्या ठिकाणीही पशुवैद्यकीय अधिकारी आणि अन्य कर्मचारी आहेत. महापालिकेत मात्र पशुवैद्यकीय अधिकारी हे एकच पद असून, त्या पलीकडे कोणताही स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही.
इन्फो..
शहरात भटक्या श्वानांच्या तक्रारी येत असतात. मात्र, त्यात डॉग बाइटपेक्षा परिसरात खूप श्वान झालेत आणि ते रात्री बेरात्री भुंकतात, या पलीकडे फार तक्रारी नाही. तरीही दिवसाला सात ते आठ तक्रारी असतात. त्यातही महापालिका डॉग व्हॅन पाठवून निर्बीजीकरणासाठी श्वान पकडते.
कोट....
महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण करण्याचे काम सुरू असते. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण जेमतेम आहे. प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाते.
- डॉ.प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा
इन्फो...
सिडको, वडाळा भागात सर्वाधिक त्रास
शहरातील सिडको पवननगर, उत्तमनगर, त्रिमूर्ती चौक, बडदे मळा, पूर्व विभागात वडाळा गाव, जुने नाशिक परिसर, पंचवटीत रविवार कारंजा, हिरावाडी रोड, द मेरी परिसर, हनुमानवाडी, पश्चिम नाशकात आकाशवाणी टॉवर परिसर, त्याचप्रमाणे नाशिक रोड येथे जय भवानी रोड, बिटको चौक, जेलरोड, उपनगर.
...
७००
एका श्वानाच्या निर्बीजीकरणासाठी खर्च
१
कंपनी करडे श्वान निर्बीजीकरणाचे काम